धुळ्यात वकीलाकडे धाडसी घरफोडी

धुळ्यात वकीलाकडे धाडसी घरफोडी

धुळे । dhule । प्रतिनिधी

शहरासह परिसरात चोरीचे सत्र (Stealing session) सुरूच असून चोरट्यांनी (thieves) आझादनगर हद्दीत वकीलाकडे (lawyer) धाडसी चोरी (daring theft) केली. चार लाख रुपये रोख, दोन तोळे सोने व चांदीचे दागिने असा लाखोंचा ()Instead of millions ऐवज लंपास (squandered) केला. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

शहरातील आझाद नगर हद्दीतील बाबा नगर उस्मानिया मस्जिद जवळ अ‍ॅड. ताजीम खान करीम खान पठाण हे राहतात. ते पुतणीच्या साखरपुड्यासाठी गेलेले होते. आज सकाळी त्यांच्या शेजारांना अ‍ॅड. खान यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. संशय आल्याने त्यांनी याबाबत अ‍ॅड.खान यांना कळविले.

धुळ्यात वकीलाकडे धाडसी घरफोडी
कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

माहिती मिळताच ते घरी आले असता घराचा कडीकोंयडा तुटलेला दिसला. घरात बघितले असता कपाटातील चार लाखांची रोकड, दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने साखळ्या, 15 भार चांदी असा एकूण मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.

धुळ्यात वकीलाकडे धाडसी घरफोडी
VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

घटनेची माहिती मिळताच यावेळी आझादनगर पोलिसांसह ठसे तज्ज्ञ, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय.पी.राजपूत, पोलीस उपनिरीक्षक एच.व्ही.हरणे, पोकॉ. राजू मिस्तरी, पोहेकॉ धनंजय मोरे, एम.एस.ब्राह्मणे, प्रशांत माळे हे घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com