जाचाला कंटाळून बापाने केला मुलाचा खून

बसरावळ येथील घटना: लाकडी धूपाटन्याने डोक्यात केला वार
जाचाला कंटाळून बापाने केला मुलाचा खून

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

सततच्या जाचाला (Tired of Jacha) कंटाळून तरूण मुलाचा (young boy) बापानेच (father) लाकडी धुपाटण्याने बेदम मारहाण (beating) करीत निर्घुण खून (murder) केला. बसरावळ (ता.साक्री) येथे काल रात्री ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

ईलमजी रामा कुवर (वय 28 रा.बसरावळ ता.साक्री) असे मयत मुलाचे नाव आहे. तो नेहमी दारु पिवुन वडील रामा धुळ्या कुवर यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देत होता. काल दि.24 एप्रिल रोजी देखील रात्री साडेआठ ते नऊ वाजेचे दरम्यान तो दारू पिऊन गाव शिवारातील शेतातील घरी आला. नेहमीप्रमाणे त्याने वडील रामा कुवर यांना तुम्ही माझ्यासाठी काय कमवुन ठेवले आहे, तुम्ही मला काय दिले, असे बोलत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत चुलीतील जळते लाकुड काढुन मारण्यास अंगावर धावला.

मात्र रामा कुवर यांनी चुलत भावाला त्यास समजविण्यासाठी बोलविण्यासाठी गेले. घरी परत आल्यानतर मुलगा ईलमजी याने पुन्हा वडीलांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमक्या दिल्या. त्यामुळे रामा कुवर यांनी लाकडी धुपाटण्याने मुलगा ईलमजी यास बेदम मारहाण केली. त्यानंतर तो रक्तबंभाळ अवस्थेत खाटेवरुन उठुन शेताच्या बांधावर जावुन पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

याबाबत निमा रामा कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात रामा कुवर याच्याविरोधात भांदवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com