वाचनामुळे कळतात नवे विचार, जीवनाचा संघर्ष- डॉ. दरवडे

वाचनामुळे कळतात नवे विचार, जीवनाचा संघर्ष- डॉ. दरवडे

धुळे dhule। प्रतिनिधी

वाचनाच्या माध्यमातून (Through reading) आपण जगाकडे नव्या दृष्टीने (new way) बघतो, विचार नव्याने कळतात तसेच बुद्धीचा वापर (Use of intellect) विवेकाने (conscience) करायला आपण शिकतो. म्हणून वाचनाची आवड (Love to read) आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अभिनय दरवडे (Dr. Darwade) यांनी विद्यावर्धिनी महाविद्यालयात (Vidyavardhini College) केले.

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित वाचन प्रेरणादिन वाचन संस्कृतीची जोपासना या विषयावर डॉ. दरवडे बोलत होते. राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई आणि विद्यावर्धिनी महाविद्यालयांच्या मराठी विभागाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड होते.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने हा कार्यक्रम प्रायोजित केला होता. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, व्हा. चेअरमन उदय शिनकर, डॉ.जयश्री गावित, प्राचार्य डॉ.देवेंद्र विसपुते, रवींद्र घोडराज, डॉ.प्रशांत लगडे व आनंद गेडाम उपस्थित होते.

वाचनाने व्यक्तिमत्व खुलते, प्रगल्भता येते, मन निर्वैर, निर्भय व निरपेक्ष बनते. त्यातून जीवनाचा संघर्ष कळतो. म्हणून वाचन गरजेचे आहे, असे डॉ. अभिनय दरवडे म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक विचारवंत, साहित्यिक व क्रांतिकारकांचे दाखले देऊन वाचनाचे महत्त्व प्रतिपादित केले. सत्यासाठी बंड करण्याची शिकवण वाचनातून मिळते. मानवी जीवनाला नवी दिशा देणारे सर्वात सोपे सुबोध शस्त्र म्हणजे पुस्तक होय असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात प्रारंभी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रशांत लगडे यांनी केले. रविंद्र घोडराज यांनी मराठी विश्वकोशाचे महत्व विशद केले. प्राचार्य डॉ.देवेंद्र विसपुते यांनी वाचनाचे फायदे नमूद केले. सहा. प्रा. श्वेता पाटकरी यांनी परिचय, प्रा. ज्योत्स्ना इंगळे यांनी मराठी विश्वकोशातील धुळे जिल्ह्याच्या माहितीचे वाचन केले. प्रा. उज्वला वाणी यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.राहुल सूर्यवंशी यांनी आभार मानले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.विजय भुजाडे डॉ. योगेश पाटील, डॉ.राज गावित प्रा. पी.ओ.व्यास उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.प्रशांत लगडे व डॉ.उज्वला वाणी यांनी केले.

तर वाचनाची आवड आवश्यक

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी छपाई यंत्रामुळे पुस्तकांचा प्रसार झाला आणि जग बदलले. मोठ्या लोकांनी जे अनुभवलं ते पुढच्या पिढीला कळले- आणि त्यातूनच वाचन संस्कृतीचा प्रसार झाला, असे प्रतिपादन अक्षय छाजेड यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कोणत्याही क्षेत्रात उंची गाठण्यासाठी वाचनाची आवड आंवश्यक आहे. आज सर्वत्र विचार- विहीन व्यक्ती घडवण्याचा प्रयत्न होत असल्याने वाचनातूनच विचारांनी प्रेरित असलेल्या व्यक्ती समाज, देश व जग बदलू शकतील, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com