मध्यप्रदेशातील चोरटा गजाआड, 6 दुचाकी हस्तगत

शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी, तीन गुन्ह्यांची उकल
मध्यप्रदेशातील चोरटा गजाआड, 6 दुचाकी हस्तगत

धुळे । dhule । प्रतिनिधी

शिरपूर शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मध्यप्रदेशातील एका चोरट्याला (Thieves) जेरबंद केले. त्याच्याकडून साडेतीन लाखांच्या चोरीच्या 6 दुचाकी हस्तगत (6 bikes seized) करीत पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

जिल्हयात ऑलऑऊट स्कीम निमित्त आज दि.21 रोजी पहाटे 1 ते 4 वाजेदरम्यान शिरपूर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर हे पथकासह पोलीस अधिकारी व पोलीस करवंद नाका येथे नाकाबंदी लावुन वाहनाची तपासणी करीत होते. त्यादरम्यान 1.30 वाजेचे

सुमारास एक जण दुचाकीसह करवंद रस्त्याकडे जातांना दिसला. त्याला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पोलीसांना पाहुन हुलकावणी देवून पळून जाण्याचे तयारीत असतांना त्याला पोलिसांनी पकडले. त्याने त्याचे नांव शक्तीसिंग चेनसिंग सरदार (वय 28 रा. दतीया, मध्यप्रदेश ह.मु.महादेव जवाईपाडा ता. शिरपुर) असे सांगितले. त्याचा संशय आल्या त्याचे ताब्यातील एच.एच.18/बी.बी. 2783 क्रमांकाची दुचाकी ही शिरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली.त्याने चोरीची कबुली दिल्याने त्याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी

केली असता त्याने आणखी इतर ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या दुचाकी महादेव जवाईपाडा येथे लावलेल्या असल्याचे त्याने सांगीतले. त्यावरुन निरीक्षक आगरकर यांनी तात्काळ शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना महादेव जवाईपाडा येथे रवाना केले. त्यांनी आरोपीसह डोंगर दर्‍यांमधुन वाट काढीत डोंगराळ भागात असलेल्या महादेव जवाईपाडा (ता. शिरपुर) येथे जावुन आरोपीने चोरी केलेल्या इतर पाच दुचाकी हस्तगत केल्या. 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या एकूण 6 दुचाकी हस्तगत करीत चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले. त्यात शिरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल 2 व नाशिक जिल्ह्यातील आडगांव पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याचा समावेश आहे.

इतर मिळुन आलेल्या दुचाकी मालकांचा शोध घेवुन संबंधीत दुचाकीबाबत दाखल गुन्हयांची माहिती घेतली जात असुन चोरट्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्हयाचा तपास पोना मनोज पाटील करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, शोध पथकाचे पोउनि किरण बार्‍हे, पोहेकॉ ललित पाटील, लादुराम चौधरी, पोना मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रविण गोसावी, सुकेश पावरा, प्रशांत पवार तसेच होमगार्ड नाना अहिरे, मिथुन पवार, चेतन भावसार व शरद पारधी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com