बोराडी येथे चार दुकान व घर एकाच रात्री चोरट्यांनी फोडले

बोराडी येथे चार दुकान व घर एकाच रात्री चोरट्यांनी फोडले

बोराडी । Boradi । वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे चोरट्यांनी (thieves) मुख्य बाजार पेठेतील (Market ) तीन ज्वलर्स दुकाने, एक चप्पल, बुट विकीचे दुकान, घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तीन महिन्यात पाचव्यांदा धाडसी चोरी (Theft) झाल्यामुळे नागरिकंमध्ये भितीचे वातावरण झाले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector) भिका पाटील (Police Bhika Patil), पोलीस नाईक भूषण चौधरी, धुळे डॉग युनिट, यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस फाटा दाखल झाला होता.

बोराडी येथे दि.20 फेब्रुवारीच्या पहाटे अज्ञात चोरांनी बोराडी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील न्हानाभाऊ कॉम्प्लेक्स (Nhanabhau Complex) मधील एक व बाजार पट्ट्यातील दोन दुकाने (shops) फोडून (Breaking) त्यातील काही रोकड व साहित्य चोरून नेले. गावातील एक बोलेरो चोरीस गेली आहे. यात बोराडी येथील एकूण तीन सोनार दुकानाचे कुलूप तोडले. दुकानाचे कुलूप तोडण्यासाठी कटरचा (Cutter) वापर करण्यात आल्याचे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात दिसून आले आहे.

कृष्णा शांतीलाल सोनार यांचे साई ज्वेलर्सचे (Sai Jewelers) कुलूप तोडून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचे सोने चोरी गेलेली आहेत. तसेच दुसर्‍या चोरीत प्रदीप सोनार यांचे निकिता ज्वेलर्स (Nikita Jewelers) येथे सत्तर हजाराचे चांदीच्या वस्तू तिसर्‍या चोरीत संजय सोनार यांच्या एकविरा ज्वेलर्स (Ekvira Jewelers) कुलूप तोडून चाळीस हजार किंमतीचे सोन्याचे साहित्य चोरून नेले आहे. तसेच देवमोगरा कॉलनीतील कैलास रावताळे बाहेर गावाला गेल्यामुळे बंद घराचे कुलूप तोडून घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला पण चोरांना त्याचे काहीच मिळून आले नाही. तसेच महाजन बूट हाऊस (Mahajan Boot House) व एक ज्वलर्सचे दुकान जवळ जवळ होते पण चोरट्यांना ज्वेलर्स दुकान न समजल्यामुळे त्यांनी चप्पल बूटचे दुकान फोडून साहित्य अस्ताव्यस्त केलेे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com