धुळे - Dhule - प्रतिनिधी :
शहरातील अवधान फाटा शिवारात सापळा रचून मोहाडी पोलिसात एका दुचाकी चोरट्याला पकडले.
त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
अवधान औद्योगिक वसाहतील एक जण चोरीची दुचाकी घेवून येत असल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सपोनि योगेश राजगुरु यांच्यासह पथकाने अवधान फाट्यासमोर सापळा लावला होता. त्यादरम्यान संशयीत निलेश राजेंद्र खैरनार (वय 30 रा.अनमोल नगर, वाडीभोकर रोड, देवपुर) याला दुचाकीसह पकडले.
चौकशीत त्याने काही दिवसा पुर्वी त्याचा अपघात झाल्याने त्याच्या उजव्या हाताला प्लास्टर लावलेले होते. प्लास्टर काढण्यासाठी तो दि. 6 रोजी हिरे शासकीय महाविद्यालयात गेला होता.
प्लास्टर काढुन आल्यानंतर त्याने एका गाडी हॅन्डल लॉक नसल्याचा फायदा घेवुन चोरून नेली. ही दुचाकी चोरीप्रकरणी अशोक भास्कर शिरसाठ यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
सखोल चौकशीत त्याने काही दिवसापुर्वी पुन्हा सिव्हील हॉस्पीटल येथुन एक गाडी चोरली असुन ती आर.पी.हॉटेलच्या मागील बाजुस असलेल्या नवीन तिखी रोडवरुन घेवुन जात असतांना पेट्रोल संपल्याने गाडी खड्डयात फेकुन दिल्याची कबुली दिली आहे.
त्याच्याकडून 40 हजार रूपये किंमतीच्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी व संशीयत आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव व उपविभाग पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु, पोना शाम काळे, पोकॉ सचिन वाघ, गणेश भामरे, अजय दाभाडे, जितेंद्र वाघ, कांतीलाल शिरसाठ यांनी केली आहे.