देवपूरातील सदाशिव नगरात लाखोंची चोरी

देवपूरातील सदाशिव नगरात लाखोंची चोरी

धुळे Dhule। प्रतिनिधी

शहरातील देवपूर परिसरात असलेल्या सदाशिव नगरात (Sadashiv Nagar) चोरट्यांनी (Thieves broke) घर (house) फोडून 25 ते 30 हजार रुपये रोकड,पाच ते सात ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून (Stolen items) नेला. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात (Devpur police station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

देवपूर परिसरातील सदाशिव नगरात प्लॉट नंबर चारमध्ये सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता विलास यादव कुलकर्णी हे परिवारासह राहतात. ते परिवारासह नाशिक येथे देवीच्या चक्रपुजानिमित्त गेले होते. त्यानंतर ते घरी परतले असता दरवाजाला कुलूप नसल्याचे दिसून आले. तर घरातील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातून 25 ते 30 हजार रुपये रोकड,पाच ते सात ग्रॅमचे सोन्याचे दागिने ज्यात अंगठी किरकोळ सोने तसेच स्वयंपाक घरातील चांदीचे वेले, चांदीच्या वस्तू असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लाबंविला.

चोरट्यांनी घराच्या दरवाज्याच्या बाजूला असलेल्या खिडकीचे ग्रील काढून आत शिरकाव करून चोरी केल्याचे निदर्शनास आले, याबाबत विलास यादव कुलकर्णी यांनी पोलीसांना चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर देवपूर पोलिस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com