दोंडाईचात बँक मॅनेजरकडे 43 हजारांची घरफोडी

दोंडाईचात बँक मॅनेजरकडे 43 हजारांची घरफोडी

धुळे - प्रतिनिधी dhule

दोंडाईचा शहरातील पार्श्‍वनाथ नगरातील बँक मॅनेजरकडे (Bank Manager) घरफोडी करीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह 43 हजारांचा ऐवज लंपास केला. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पार्श्‍वनाथ नगरातील प्लॉट क्र. 49 ब मध्ये सिताराम खंडू सुर्यवंशी (वय 58) हे बँक मॅनेजर राहतात. ते कुटुंबियांसह बाहेर गावी गेलेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते.

ही संधी साधत चोरट्यांनी दि.12 ते 18 ऑगस्टदरम्यान त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातून रोख रक्कमेसह चांदीचे दागिने असा एकुण 43 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला. याबाबत सुर्यवंशी यांनी काल दोंडाईचा पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास पोहेकाँ पाटील करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com