बसमध्ये चढतांना महिलेचे मंगळसुत्र लांबविले

बसमध्ये चढतांना महिलेचे मंगळसुत्र लांबविले

धुळे । Dhule। प्रतिनिधी

बसमध्ये चढतांना (While boarding the bus) चोरट्याने (Thieves) महिलेचे (women) सोन्याचे मंगळसूत्र (Mangalsutra of gold) लंपास (Lampas) केल्याची घटना शिरपूर (Shirpur) बसस्थानकात (bus stand) घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत चित्राबाई सतिष पाटील (वय 35 रा. प्लॉट नं. 292, अविरभाव सोसायटी नं.2, पांडेसरा, सुरत, गुजरात) यांनी शिरपूर शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्या रविवारी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास शिरपूर बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढत होत्या. तेव्हा चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांचे दहा हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकाँ ललीत पाटील करीत आहेत.

बॅटरी चोरण्याचा प्रयत्न-

शिंदखेडा तालुक्यातील मंदाणे गावातील मुख्य गावदरवाजाजवळ उभ्या ट्रॅक्टरची (क्र. एमएच 18 एएन 2978) बॅटरी चोरट्याने लंपास करण्याचा प्रयत्न केला. तिची किंमत 7 हजार रूपये आहे. काल रात्री ही घटना घडली. याबाबत शेतकरी सुनिल देसले (वय 47 रा. मंदाणे) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखज करण्यात आला आहे.

जुगार खेळविणारा ताब्यात-

धुळे तालुक्यातील नेर गाव शिवारात बंद टपरीच्या आडोश्याला जुगार खेळविणार्‍या एकास एलसीबीच्या पथकाने पकडले. संजय राजु कोळी (वय 36 रा. नेर) असे त्याचे नाव आहे. अंगझडतीत त्यांच्याकडून 3 हजार 840 रूपये जप्त करण्यात आले. पोकाँ राहुल गिरी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

एकास बेदम मारहाण-

दोंडाईचा शहरातील नंदुरबार रोडवरील एसटी डेपोच्या पुढे महामार्गाच्या कडेला कौटूंबिक वादातून रनजितसिंग मोहनसिंग राजपुत (वय 29 रा. महादेवपुरा, दोंडाईचा) यास दोन जणांनी मारहाण केली. सुनिल गुलाबसिंग राजपुत याने मागावून धरून ठेवले तर सतपालसिंग उर्फ काकासाहेब राजपुत (रा.नवसारी) याने हाताबुक्यानी तोंडावर मारून जखमी केले. काल सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रनजिसिंग यांनी दोघांविरोधात दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली आहे.

घरातून दहा हजार लांबविले-

वडगाव (ता. धुळे) येथून दहा हजारांची रोकड चोरी केल्याप्रकरणी एकावर दीड महिन्यानंतर गुन्हा नोंद झाला आहे. सुरेखा जितेंद्र पाटील (रा. वडगाव) यांच्या घराच्या दुसर्‍या मजल्यावरील घरात गावातील रूपेश राजेंद्र पाचपांडे याने दि. 2 सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास प्रवेश केला. घरातील लोखंडी रॅकमधील डब्यातून 10 हजारांची रोकड लंपास केली. याबाबत त्याच्या फिर्यादीवरून संशयीतावर गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com