रानडुक्करांनी भुईमूग केला फस्त, शेतकर्‍यांची भरभाईची मागणी

रानडुक्करांनी भुईमूग केला फस्त, शेतकर्‍यांची भरभाईची मागणी

मालपूर Malpur । वार्ताहर

येथील चोरझिरा शिवारात रानडुक्करांनी (wild boars) उच्छाद मांडला असून भुईमुगाची (Peanuts) शेतीच फस्त (Agriculture is fast) केली. शेतकर्‍याने नुकसान भरपाईची (Compensation) मागणी केली आहे.

रब्बी हंगामात पंडीत गोकुळ इंदवे यांनी शेतात तीन एकरक्षेञात भुईमुगाचे पिकाचा पेरा केला होता. परंतु रानडुक्करांनी रात्री पेरलेला भुईमुग फस्त केला. हे पाहताच शेतकरी श्री. इंदवे यांना रडू कोसळले. कारण पावसाळी पिक हातचे गेले. आता तरी रब्बी पिकात कसर निघेल, अशी आशा ठेवुन त्यांनी सावकाराकडुन व्याजाने पैसे काडुन भुईमुगाचे बिजवाई घेतली. मोठ्या आशेने रात्र पाळीतुन पाणी भरले. मात्र सकाळी गेलो असता रानडुक्करांनी हा उच्छाद पाहुन त्यांना धक्काच बसला. दरम्यान श्री. इंदवे यांनी वनविभागाकडे रानडुक्करांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आम्हांला पकडण्याची परवानगी द्यावी, असा अर्जही केलेला होता. त्यावर वनविभागाचे अधिकारी तुमच्यावर कारवाई करु, असे म्हणतात. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी काय करावे?असा प्रश्न पडला आहे. त्यांनी वनविभाग नंदुरबार, मालपुर ग्रामपंचायत, दोंडाईचा पोलीस ठाणे येथे अर्ज दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com