Breaking विहीर ढासळली ; आई आणि मुलगा ढीगाऱ्याखाली दबले

रात्रीपासून पोकलेनच्या मदतीने बचावकार्य सुरूच
Breaking विहीर ढासळली ; आई आणि मुलगा ढीगाऱ्याखाली दबले
संग्रहित चित्र

धुळे - प्रतिनिधी dhule

मोरशेवडीत (ता.धुळे) येथे खोदकाम सुरु असलेली विहिर (Well) खचल्याने माय आणि लेक ढिगार्‍याखाली दबले गेले. तर सुदैवाने एक जण बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका (police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. (Pokland) पोकलँडच्या सहाय्याने दोघांचा जिव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सुनिता भिका पवार (वय 39), शाम भिका पवार (वय 10 रा.मुळ डोंगरी पोस्ट साकुरा ता.नांदगाव) अशी ढिगार्‍याखाली दबलेल्या माय-लेकाची नावे आहेत. तर भिका छगन पवार (वय 40) हे बचावले आहेत. मोरशेवडी गाव शिवारात विहिर खोदण्याचे काम सुरु होते.

काल सायंकाळी कठड्याचे काम सुरू असतांना अचानक विहिर धसली. त्यामुळे तिघे खाली कोसळले. सुद्देवाने भिका छगन पवार हे बचावले. मात्र माय-लेक मातीच्या ढिगार्‍याखाली दबले गेले.

Related Stories

No stories found.