विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत

तीन जण जखमी, हॉटेलचे नुकसान, मात्र पोलिसात नोंद नाही
विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत

दोंडाईचा । Dondaicha । श.प्र.

विखरण (Vikharan) ता. शिंदखेडा येथील द्वारकाधीश भगवान(Dwarkadhish in Lord Yatra) यात्रेत दोन गटात वाद (Argue in two groups) होऊन हाणामारी (fighting) झाल्याने यात्रेत आलेल्या भाविकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊन दंगल सदृश्य परिस्थिती (riot-like situation) निर्माण झाली होती. वेळीच पोलिसांनी हस्तपेक्ष केल्याने पुढील अनर्थ टळला म्हणावा लागेल. मात्र या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल नाही.

विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत
नंदुरबारात 20 नोव्हेंबरला घुमर महोत्सव

काल दि. 4 रोजी भगवान द्वारकाधीश यात्रेत सायंकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटात वाद उफळला होता. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात तीन ते चार तरुण जखमी झाल्याचे समजते. या वादामुळे यात्रेमधील भाविकांची मोठी धांदल उडाली. भितीने ते सैरावैरा धावत तेथून बाहेर पडलेत. काही वेळ यात्राही बंद पडली. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना सौम्य लाठीचार्ज करत पांगविले. या वादात एका हॉटेलवर दगडफेक होवून तोडफोड करण्यात आली आहे.

विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत
...आणि 24 तासातच पोलिसांनी केला कल्पतरू सोसायटीतील घरफोडीचा उलगडा

याप्रकरणी दोघी गटांकडून कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढे न आल्याने नोंद झालेली नाही. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहायक पोलीस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक शरद लेंडे, उपनिरीक्षक सचिन गायकवाड, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला.

विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत
यावलमध्ये एकाची गळफास घेवून आत्महत्या

जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर उपविभागीय अधिकारी दिनेश आहेर यांनीही घटनास्थळी भेट दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com