टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला

टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शहरातील चाळीसगाव चौफुलीनजीक आज पहाटे टोमॅटो (tomatoes) घेऊन जाणार्‍या भरधाव ट्रकचे (truck) अचानक टायर फुटल्याने (tires burst) अपघात (Accident) झाला. त्यामुळे ट्रक मधील सर्व टोमॅटो रस्त्यावर पसरून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक चालक जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

कोपरगाव येथून एम. एच. 17 बीव्ही 4265 क्रमांकाचा ट्रक टोमॅटो भरून इंदूरच्या दिशेने जात होता. आज पहाटे धुळ्यातील चाळीसगाव चौफुली नजीक या भरधाव ट्रकचे टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

ट्रक रस्त्यावर उलटून त्यातील टोमॅटो रस्त्यावर पसरले. ट्रकसह टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दुभाजक देखील तुटले आहे. दरम्यान यावेळी अनेक नागरिकांनी सध्या चांगला भाव असलेल्या रस्त्यावर पसरलेले टोमॅटो वाहून नेले.

टोमॅटो खाण्यासाठी गुरांनी देखील गर्दी केली होती. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत सुरू केली. या अपघातात ट्रक व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com