चालत्या ट्रॅक्टरमधून ट्रॉली वेगळी, रेस्टहाऊसच्या भिंतीवर जावून धडकली

चालत्या ट्रॅक्टरमधून ट्रॉली वेगळी, रेस्टहाऊसच्या भिंतीवर जावून धडकली

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील संतोषी माता चौकात धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची (running tractor trolley) अचानक पिन निघाल्याने ट्रॉली वेगळी ()trolley separates निघून थेट गुलमोहर रेस्ट हाऊसच्या संरक्षण भिंतीवर (Defense wall of Gulmohar Rest House) जावून आदळली. सुदैवाने या अपघातात (accident) कुणीही जखमी झाले नाही.

देवपूरातील नवरंग पाण्याची टाकी येथून राजेंद्र धोंडू धोबी हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये (क्र.एम.एच.18 एन.3621) पाणीपुरवठ्याचे पाईप घेवून जात होता. त्यादरम्यान शहरातील संतोषी माता चौकात ट्रॅक्टरची पीन अचानक तुटल्याने ट्रॉली ट्रॅक्टरपासून वेगळी झाली. त्यानंतर ट्रॉली गुलमोहर रेस्ट हाऊसच्या भिंतीवर आदळी. त्यामुळे भिंतीचे नुकसान झाले. पंरतू सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com