मका पिकाकडे वाढतोय शेतकर्‍यांचा कल

वाढलेला भाव, उत्पादकता आणि सहज उपलब्ध होणार्‍या बाजारपेठचा परिणाम
मका पिकाकडे वाढतोय शेतकर्‍यांचा कल

शिंदखेडा Shindkheda । प्रतिनिधी

तालुक्यात कापूस, बाजरी, मुग, तुर, दादर, हरभरा ही पिके (crop) प्रमुख पिके मानली जातात. अलिकडे वाढलेल्या बागायती क्षेत्रामुळे (Horticulture area) ऊस, केळी, कांदा, फळशेती आणि मका या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. शिंदखेडा तालुक्यात जवळपास 60 टक्के शेती बागायती तर 40 टक्के शेती कोरडवाहू (Drought) केली जाते. वरील पिके घेतली जात असतानाही शेतकर्‍यांचा (farmers) सर्वाधिक कल हा कापूस लागवडीकडे होता. परंतु मागील काही वर्षांपासून मान्सुनचा (Monsoon) लहरीपणा, मजुरांची टंचाई आणि बोंडअळी यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत होते. परंतु त्यास पर्याय म्हणून मका (Maize) या पिकाकडे शेतकरी वळत असल्याचे दिसून येत आहे.

कापूस हे पिक बागायत व कोरडवाहू या दोन्ही प्रकारच्या शेतीत घेतले जाते. यामुळे अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतीचे सर्वाधिक क्षेत्र कापसाचे (Most area cotton) होते. परंतु मागील काही वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला (Damage) सामोरे जावे लागत आहे. काही बागायतदार शेतकरी हे ऊसाकडे (sugarcane) वळले आहेत. परंतु वेळेवर न होणारी ऊसतोड आणि यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.

यावर पर्याय म्हणून सध्या बागायतीसह कोरडवाहू शेतकरीही मका पिकाकडे वळु लागले आहेत. आधी ज्वारी तसेच दादर या पिकाला पर्यायी म्हणून मका पिक (maize crop) घेतले जात होते. परंतु आता कोरडवाहू शेतकरी कापसाला पर्यायी म्हणून मका पिकाकडे पाहु लागले आहेत. मका पिक हे कोरडवाहू शेतीत हेक्टरी 60 ते 70 क्विंटल एवढे उत्पन्न येत आहे.

तर बागायती शेतीत हेक्टरी 80 ते 90 क्विंटल उत्पन्न येत आहे. मागील वर्षी मका पिकाला (maize crop) 1000 ते 1300 भाव होता. तर यंदा 2200 ते 2400 पर्यंत अर्थात दुप्पट भाव वाढ झाली असल्याने तसेच सध्याच्या काळात मजूर टंचाई ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. मका पिकाला मजुरांची (laborers) जास्त आवश्यकता भासत नाही. तसेच मका पिकाला लागणारी बाजारपेठही सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे उत्पादकता, वाढलेले भाव आणि सहज उपलब्ध होणारी बाजारपेठ (Market) यामुळे मका पिक शेतकर्‍यांना फायदेशीर ठरत असून या पिकाकडे शेतकर्‍यांचा कल वाढलेला आहे.

95 ते 110 दिवसात उत्पन देणारे पीक-

कापूस पिकाला साधारणपणे 8 महिने लागतात. पूर्ण वर्ष एकाच पिकाला लागते. त्याऐवजी मका हे पीक केवळ 95 ते 110 दिवसात उत्पन्न देणारे पीक असून ज्या शेतकर्‍यांना ऊसाची लागवड करायची असेल त्यांच्यासाठी तर मका पीक अतिशय फायदेशीर ठरते.

कारण साधारणतः ऑक्टोबरमध्ये ऊसाची लागवड शेतकरी करतो आणि ऑक्टोबरपर्यंत मकाचे उत्पन्न घेऊन आपले शेत मोकळं होत. म्हणजे पुढचं पीक (crop) पण लागवड होते आणि एक सिझनचे उत्पन्न देखील शेतकर्‍यांना मिळते. ज्या शेतकर्‍यांना 3 पिके घ्यायची असतील त्यांना देखील वर्षातून तीनवेळा उत्पन्न देणारे हे पीक असून कमी दिवसात म्हणजे केवळ 95 ते 110 दिवसात हे पीक येते. त्यामुळे मका सर्वानाच फायद्याचे आहे. यंदाच्या वर्षी मक्याचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत.

मका लागवडीला प्राधान्य मागील वर्षाच्या खरीप हंगामात कोरडवाहू जमिनीत मी 3 एकर मका पिक घेतले. त्यात एकूण 65 क्विंटल उत्पन्न आले. शिवाय 2200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. शिवाय मजुराचे हे कोणताही ताण नाही. सर्व यांत्रिक अवजारे वापरले. आणि त्या पिकावर मी त्यानंतर हरभराही पिक घेतले आणि त्याचे ही चांगले उत्पन्न आले. अनेक वर्षापासून कपाशीची उत्पन्न घेत होता. परंतु बोंडअळी, मजूर टंचाई या सर्वांना कंटाळून या खरीप हंगामात मी तब्बल 4 हेक्टर कोरडवाहू जमिनीत मका लागवड करणार आहे.

-अशोक धर्मा निळे, शेतकरी कमखेडा ता. शिंदखेडा

Related Stories

No stories found.