तलाठी पथकाला दमदाटी, वाळूचा ट्रॅक्टर पळविला

तलाठी पथकाला दमदाटी, वाळूचा ट्रॅक्टर पळविला

दोंडाईचा Dondaicha । श.प्र.

शिंदखेडा तालुक्यातील कर्ले- परसोळे रस्त्यावर धनदाई माता मंदिर जवळ हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर (sand tractor) व ट्रॉली विना क्रमांकाचे वाहनातून अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणारे पकडले. त्याचा राग येऊन तलाठी पथकाला (Talathi team) दमबाजी व शिवीगाळ करून ट्रॅक्टर पळवून नेला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ले-परसोळे रस्त्यावरील धनदाई माता मंदिर जवळ हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली विना क्रमांकाचे अंदाजे एक ब्रास वाळूने भरलेली ट्रॉली आढळून आली. वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सांगण्यास नकार दिला. तेवढ्यात एक व्यक्ती मोटरसायकलवर आला. त्याने त्याचे नाव हरीष निंबा देवरे (वय 39 वर्ष) रा. कर्ले ता. शिंदखेडा मी ट्रॅक्टर मालक असल्याचे सांगितले.

संबंधित मालकास गौण खनिजाचा वाळू वाहतूकीचा परवाना बाबत विचारले असता त्याच्याकडे गौण खनिज वाळू वाहतुकीबाबत कोणताही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यावेळी ट्रॅक्टर मालकास रितसर ट्रॅक्टर कायदेशीर कारवाईसाठी घेऊन पोलीस स्टेशन दोंडाईचा येथे घेण्यासाठी सांगितले असता ट्रॅक्टर मालक श्री. देवरे हे तलाठी पथकास यांच्या जवळील दुचाकी वाहनावरून उतरून पथकातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ व अरेरावीचे शब्द वापरून जीवे मारण्याची धमकी दिली.

कायदेशीर कारवाई करण्यासाठी ट्रॅक्टर पोलीस स्टेशन दोंडाईचा येथे नेत असतांना त्यांच्या वाहन चालकाला ट्रॅक्टर पुढे नेऊ नको असे सांगून ट्रॅक्टर मालक स्वतः ट्रॅक्टरच्या समोर आडवा झोपून त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. व ट्रॅक्टर मालकाने आपल्या आईला दूरध्वनीद्वारे संपर्क करून आपल्याकडून विषारी औषधाची बाटली घेऊन कर्ले-परसोळे रस्त्यावरील धनदाई माता मंदिराजवळ ये असे सांगितले. त्या दोघांनी गौण खनिज पथकाशी वाद घालून ट्रॅक्टर मालक व त्यांच्या आईने चालकास तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करून न थांबता पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रॉली घेऊन कर्ले गावाच्या दिशेने पळवून नेले.

याप्रकरणी कर्ले तलाठी सुभाष शिवदास कोकणी (वय 39 वर्ष) यांनी महसूल कर्मचार्‍यांना पोलीस ठाण्याला नेण्याचे आदेश केले. मात्र, संशयित हरिष निंबा देवरे रा. कर्ले याने कर्मचार्‍यांना शिवीगाळ, दमदाटी केली तसेच शासकीय कामात अडथळा आणून ट्रॅक्टर महसूल कर्मचार्‍यांना दमबाजी करुन वाळूचा ट्रॅक्टर पळवून नेला. तलाठी कोकणी यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हरिष देवरे विरुध्द भादंवि 379, 201, 353, 34 सह महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 /7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com