सुर्य ओकू लागला आग, उष्माघाताचे कक्ष सुरु

तापमानाचा पारा 43 अंशावर, घामांच्या धारा, अंगाची लाहीलाही
सुर्य ओकू लागला आग, उष्माघाताचे कक्ष सुरु

धुळे Dhule। प्रतिनिधी

सुर्य आग ओकू (sun began to shine) लागल्यामुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा (Temperature mercury) 43 अंशावर गेला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्माघातापासून (Heatstroke) बचाव करण्याबाबत प्रशासनाकडून (administration) सूचना देण्यात आल्या आहेत. तर एखाद्याला ऊन लागले तर त्वरीत उपचार मिळावा यासाठी धुळ्यात जुने जिल्हा रुग्णालय (District Hospital) व हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उष्माघात कक्ष (Heatstroke Room) सुरु करण्यात आला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सुर्य तप्त झाला असून तो आग ओकू लागला आहे. दिवसागणिक तापमानात वाढ (Increase in temperature) होत आहे. आज तापमानाचा पारा 43 अंशावर जावून ठेपला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. प्रशासनाने उन्हापासून संरक्षण (Sun protection) करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

शहरातील चक्करबर्डी परिसरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि साक्री रोडवरील जुने जिल्हा रुग्णालय येथे उष्माघात कक्ष (Heatstroke Room) सुरु करण्यात आला आहे. या कक्षात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून हिरे रुग्णालयात मेल व फिमेल वार्डात प्रत्येकी दोन असे चार बेड उष्माघाताच्या रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. बेडजवळ कुलर (Cooler) इतर सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात अपघात विभागात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे. तेथे ही दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत दोन्ही कक्षात एकही रुग्ण दाखल झालेला नाही.

शहरी भागात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे. असाच कक्ष ग्रामीण रुग्णालयांमध्ये (Rural hospitals) सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार कसे करावे याची माहिती देण्यासाठी डॉक्टर व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तापमानाचा पारा 43 अंशावर गेल्यामुळे दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवर (roads) शुकशुकाट दिसून येत आहे. तर उन्हामुळे बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. उन्हाचा परिणाम सरकारी कार्यालयांवरही झाल्याचा दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला शाळेच्या (school) वेळेत देखील उन्हामुळे बदल करावा लागला आहे. तप्त उन्हामुळे जलाशय आटण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठ्याचे नियोजन (Water supply planning) कोलमडले आहे. उन्हापासून गारवा मिळावा म्हणून नागरिक शीतपेयांचा (soft drinks) आधार घेत आहेत. दुपारनंतर शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी झालेली दिसून येत आहे.

डॉक्टरांच्या सूचना

तापमानाचा पारा 43 अंशावर गेल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, भरपूर पाणी व सरबत प्यावे, सैल कपडे परिधान करावे, शक्यतोवर उन्हात जावू नये, उन्हात गेल्यास छत्री, रुमाल, टोपी, गॉगल यांचा वापर करावा, अंगावर पांढरे कपडे परिधान करावे, घर, कार्यालयात खिडक्या व दरवाजांना पडदे लावावे, लिंबू, टरबूज, शहाळ याचा आधार घ्यावा अशा सूचना डॉक्टरांनी केल्या आहेत.

...तर वैद्यकीय सल्ला घ्या!

तापमान वाढले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हापासून त्रास झाला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, शहरात हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जुने जिल्हा रुग्णालय येथे उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

-डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक

Related Stories

No stories found.