अन् सांडलेल्या दाण्यांनी दाखविला चोरट्यांचा मार्ग

अन् सांडलेल्या दाण्यांनी दाखविला चोरट्यांचा मार्ग

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

सोयाबीनचे वाढते भाव लक्षात घेता व्यापारी (Merchant) सोयाबीन खरेदी (buys beans) करीत आहेत. मात्र खरेदी केलेला माल गोडाऊनमधून चोरटे लंपास (Thieves lamps) करत असल्याच्या घटना घडत आहे. दरम्यान पोलिसांनी उपबाजार समितीपासून रस्त्यावर सोयाबीने दाणे (Soybeans on the street)पडलेल्या मार्गाने (the way) जात एकाला अटक (Arrested) केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयाबीन या पिकाचे वाढते भाव लक्षात घेता यंदा शेतकर्‍यांनी आपला सोयाबीन साठवून ठेवला आहे. तर व्यापारी खरेदी करीत असलेला सोयाबीन आपल्या गोडाऊनमध्ये साठवत आहेत. पण मध्यरात्री, पहाटे सोयाबीनचे वाढते भाव लक्षात घेता चोरट्यांनी आपला मोर्चा व्यापार्‍यांच्या गोडाऊनकडे वळवला असून सोयाबीन चोरीच्या घटना वाढत आहे. पिंपळनेर शिवारातील शेतकरी संजय शंकर कोठावदे यांचे सटाणा रोडकडे शेत असून त्यांनी कांदा चाळीत सोयाबीनने भरलेल्या 11 गोण्या ठेवल्या होत्या. त्या साडे सहा क्विंटल रुपये प्रमाणे 40 हजार रुपये किंमतीचा हा माल काही दिवसांपुर्वीच चोरट्यांनी लंपास केला. तसेच देशशिरवाडे शिवारात शेतकरी बळवंत विठ्ठल कोठावदे यांच्या शेतामधून कांद्याच्या चाळीत साठवलेला अंदाजे 37 क्विंटल सोयाबीन चोरट्यांनी शेड तोडून चोरून नेला. त्यांची किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार इतकी आहे. वाढत्या घटनांमुळे देशशिरवाडे गावातील शेतकर्‍यांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शेतकर्‍यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. तसेच पिंपळनेर उपबाजार समितीत किशोर नानाभाऊ पाटील व हरिदास रामदास शिरसाठ यांनी भागीदारीवर व्यापार करीत आहेत. त्यांनी उपबाजार समितीत सोयाबीन खरेदी करून तो तेथेच साठवला जातो. पण मध्यरात्री मागून तारेची जाळी तोडून चोरट्यांनी अंदाजे 300 किलो सोयाबीन लंपास केले. 19 हजार 500 रूपये त्यांची किंमत आहे. सकाळी पाहणी करते वेळी सोयाबीन चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तेव्हा सोयाबीनचे दाणे रस्त्याने पडत गेल्याने त्या मार्गाने जात काही अंतरावरच 300 किलो चोरीस गेलेला सोयाबीन एका घरात मिळून आला. पोलिसांनी आरोपी गुलाब बाबूलाल शिंदे याला खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्यावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची कसून चौकशी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com