
धुळे - प्रतिनिधी dhule
साक्री (Sakri) तालुक्यातील ऑनर किलींगची (Honor killing) घटना ताजी असतांनाच उमरदा शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून मुलाचेच तिक्ष्ण हत्याराने वार करत वृध्द पित्याची निर्घुण हत्या (Murder) केली.
घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी फरार झालेल्या मुलावर (shirpur) शिरपूर तालुका (police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-पत्नीच्या भांडणार हस्तक्षेप केल्याचे वृध्द पित्याचा चांगलेच महागात पडले. पेमा हिरा पावरा (वय 72 रा. कढईपाणी, उमरदा ता. शिरपूर) असे दुर्देवी मयत पित्याचे नाव आहे. काल सायंकाळी त्यांचा मुलगा सुकराम पेमा पावरा (वय 51) व त्याच्या पत्नीचे भांडण सुरू झाले. सुकराम हा त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत होतो. तेव्हा वडील पेमा मुलाला समजविण्यास गेले. त्याचा राग येवून सुकराम याने तिक्ष्ण हत्याराने वडीलांच्या पाठीवर वार करत त्यांना जिवे ठार मारले.
घटनेनंतर सुकराम हा पळुन गेला. याबाबत बिकराम पेमा पावरा (वय 27) याने दिलेल्या फिर्यादीवरून सुकाराम पावराविरोधात भांदवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय सुरेश शिरसाठ करीत आहेत.