मुलाने दिला घटस्फोट, पित्याला बेदम मारहाण

मुलाने दिला घटस्फोट, पित्याला बेदम मारहाण

धुळे Dhule। प्रतिनिधी

मुलाने घटस्फोट (Divorced) दिल्याच्या रागातून (anger) पित्याला दोघांनी (Both of them) बेदम मारहाण (brutal beating) करत सोनसाखळीही जबरीने काढून नेल्याची घटना दोंडाईचा शहरात घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (crime) नोंद झाला आहे.

याबाबत भरत गोविंदा दुरगुळे (वय 44 रा. इसर्डे ता. साक्री) यांनी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा अशोक याने काशिनाथ डोंगर कोरडकर यांच्या मुलीला घटस्फोट दिला. त्या कारणावरून दि.6 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भरत दुरगुळे व त्याचा भाऊ गोविंदा दुरगुळे हे दोघे दोंडाईचात आलेले असतांना काशिनाथ कोरडकर आणि मगन काशिनाथ कोरडकर (रा. रमकी तलाव ता. निझर जि. तापी, गुजरात) या दोघांनी भरत याला हाताबुक्यांनी मारहाण केली.

तेव्हा त्यास भावाने सोडविले. मात्र त्यानंतर पुन्हा बसस्थानकाकडे जात असतांना दोघांनी भरत यास अडवून मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील 35 ग्रॅमची सोन्याची चैन जबरीने काढून पळुन गेले. त्यावरून दोघांवर दोंडाईचा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून तपास सपोनि लोले करीत आहेत.

एकाची आत्महत्या-

शिदखेडा तालुक्यातील मांडळ शिवारातील कोठारी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर गळफास घेत एकाने आत्महत्या केली आहे. काल सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमासस ही घटना लक्षात आली. जनार्दन कारभारी चकोर (वय 45 रा. राणीपुरा, होळी चौक, दोंडाईचा) असे मृताचे नाव आहे. याबाबत दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना शेख करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com