धोका वाढला, एकाच दिवसात आढळले 45 कोरोना रुग्ण

धोका वाढला, एकाच दिवसात आढळले 45 कोरोना रुग्ण

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा धोका (Danger of corona) वाढला असून एकाच दिवसात 45 रुग्ण (45 patients) आढळून आले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतू दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 45 रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. आता तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टचा एक अहवाल पॉझिटीव्ह आला असून सोनगीर येथे एक रुग्ण आढळला आहे. एसीपीएम लॅबमधील सहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. वैद्यनगर, अजबेनगर, सत्य साईबाबा कॉलनी, देवपूर दत्तमंदीर, दीपलक्ष्मी कॉलनी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

खाजगी लॅबमधील 37 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात सुयोग नगर, वल्लभनगर, बडगुजर कॉलनी, देवपूर, माधवपुरा, पारोळारोड येथे प्रत्येकी एक, साक्रीरोड दोन, आग्रारोड दोन, विठ्ठलनगर एक, मालेगावरोड एक, निसर्गोपचार केंद्र एक, नेहरुनगर एक, प्रभाकर सिनेमासमोर एक, देवपूर एक, सुयोग नगर एक, गांधी पुतळा एक, संभाजी नगर एक, पाटील नगर एक, आनंदनगर एक, साईदर्शन कॉलनी एक, जयहिंद कॉलनी चार, गोंदूररोड एक, प्रभातनगर एक, मोराणे प्र.लळींग दोन, कावठी मेहेरगाव एक, मोहाडी प्र. डांगरी एक, पुणे एक, यवतमाळ तीन असे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 46 हजार 37 कोरोना बाधीत आढळले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com