लोकशाहीतील तिन्ही स्तंभांचा सहभाग महत्वाचा

न्यायमूर्ती कोतवाल: पोलिस प्रशिक्षण केंद्रात शासकीय योजनांचा महामेळावा
लोकशाहीतील तिन्ही स्तंभांचा सहभाग महत्वाचा

धुळे Dhule । प्रतिनिधी

कायदे व शासनाच्या योजना (Government schemes) समाजातील सर्व घटकांपर्यंत (all the elements) पोहचविण्यासाठी (reach) लोकशाहीतील तिन्ही स्तंभांचा (three pillars) सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन न्यायमूर्ती एस.व्ही.कोतवाल (Justice S.V. Kotwal) यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत शासकीय योजनांचा महामेळावा पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये भरविण्यात आला होता. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती कोतवाल हे बोलत होते. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर.एच.मोहम्मद, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य किशोर काळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अखिल भारतीय जनजागृती कार्यक्रम 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर याकाळात राबवत आहे.त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नुकताच शासकीय योजनांचा महामेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये शासनाचे सर्व योजनांचे माहितीपर स्टॉल तसेच अर्ज भरून घेणे, लाभ वितरित करणे या बाबींची सुविधा दिली होती.

न्यायमूर्ती श्री.कोतवाल व इतर मान्यवरांनी सर्व स्टॉलला भेट दिली. समाजातील नागरिकांनी महामेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेषतः शिधापत्रिका वितरण, बचत गटांचे कर्ज वितरण, दिव्यांग विभागामार्फत साहित्य वितरण, जन शिक्षण संस्थांन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, वनविभागामार्फत उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण, सेंट अँथनी स्कूलमार्फत युनिवर्सल पास यासारख्या योजना तेथे ठेवण्यात आलेल्या होत्या. न्यायमूर्ती श्री.कोतवाल हे म्हणाले की, शासनाच्या योजना कायदे हे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कार्यरत राहणे आवश्यक आहे. कायदेविषयक अज्ञानातून गंभीर गुन्हे घडतात. मोठ्या समस्या निर्माण होतात, म्हणून समाजातील सर्व घटकांचे कायद्याबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर.एच.मोहम्मद म्हणाले की, या मेळाव्यानिमित्त तृतीयपंथीयांना त्यांची नोंदणी होऊन रीतसर ओळखपत्र प्रदान झाले ही महत्त्वाची बाब या मेळाव्याच्या निमित्ताने घडून आली, हा महा मेळाव्यातील सर्वात मोठा क्षण आहे. तृतीय पंथीयांना सन्मानाने वागणूक मिळणे हा मानवी अधिकाराचा भाग आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे या दृष्टीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या मेळाव्यानिमित्त अनेक लाभार्थ्यांना लाभ वितरित केले असल्याची बाब कथन केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी समाजातील कायदा व सुव्यवस्था जर अबाधित ठेवायची असेल तर शासनाची प्रत्येक योजना ही लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना समाजातील मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. दीपक डोंगरे यांनी अखिल भारतीय जनजागृती कार्यक्रमासाठी सातत्याने राबत असलेले पॅनल लॉयर, विधी स्वयंसेवक, कर्मचारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. सारंग गुजराथी यांनी केले.

शासकीय अधिकार्‍यांचे सहकार्य

कार्यक्रम हा सर्व शासकीय अधिकारी यांच्या सहकार्याने घेण्यात आला. महामेळाव्यामध्ये महिला बाल विकास विभागाचे मुकुंद बागुल, उपवनसंरक्षक माणिक भोसले, तहसीलदार संजय शिंदे, गटविकास अधिकारी आर.डी.वाघ, समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर व श्री.पवार, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे उद्धव धारणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे हेमंत भदाणे,आदिवासी प्रकल्पचे श्री.भडगावकर, जन शिक्षण संस्थांच्या तय्यबा शेख, फादर विल्सन रोड्रिक्स, वकील संघाचे अध्यक्ष डी.जी.पाटील, जिल्हा सरकारी वकील श्री.तवर, केंद्र शासनाचे वकील समीर पंडित, उपाध्यक्ष मधुकर भिसे, मीना भोसले, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी, विधी महाविद्यालयाचे व आघाव अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी या सर्वांनी महामेळावा यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com