कर्मचार्‍यांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी संस्था प्रयत्नशील

राजगोपाल भंडारी; आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे सेवानिवृत्त झालेल्या 44 कर्मचार्‍यांचा सत्कार
कर्मचार्‍यांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी संस्था प्रयत्नशील

शिरपूर Shirpur। प्रतिनिधी

संस्थेचे कर्मचारी निवृत्त (Employees retired) झाले तरी त्यांच्याशी आमचे कायमस्वरूपी स्नेहसंबंध, (Affectionate relationship) ऋणानुबंध राहतील. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या पेन्शनचे काम आम्ही लक्ष घालून पूर्ण करणार आहे. सर्व कर्मचार्‍यांना कोणत्याही लाभापासून वंचित राहू नये म्हणून सेवा पुस्तके नेहमीच अद्ययावत (Service books are always up to date) ठेवण्यासाठी नियमितपणे प्रयत्न केले जातात. सर्व कर्मचार्‍यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी संस्था प्रयत्नशील असते. कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी नेहमीच प्राधान्य दिले जाते, असे प्रतिपादन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष (Vice President of Shirpur Education Society) राजगोपाल भंडारी (Rajagopal Bhandari,) यांनी केले.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे सेवानिवृत्त 44 कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच हृदयविकारामुळे व अचानक मृत्युमुखी झालेल्या 16 कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यात आले. राजगोपाल भंडारी पुढे म्हणाले, संस्थेच्या प्रगतीसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांची फारच तळमळ आहे

. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेसाठी सर्व कर्मचारी यांनीही फार मोठे योगदान दिले आहे. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. कोरोना काळात कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसाठी संस्थेच्या वतीने आपण मनापासून सेवाभावी काम केले. असंख्य कर्मचार्‍यांना एकूण 60 ते 70 लाख रुपये विमा मंजूर करुन दिला. जागतिक योग दिनी दरवर्षी आपण व्यापक स्वरुपात योग कार्यक्रम करतो. सर्वांनी दररोज नियमितपणे योगा करावा. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा व्यायाम, योगा करून सुदृढ रहावे.

परिवारात सर्वांचा सांभाळ करावा. आपण संस्थेतर्फे योग विद्या धामच्या सहकार्याने आतापर्यंत 50 योगशिक्षक बनविले. दरवर्षी नियमितपणे योगशिक्षक तयार व्हावे यासाठी प्रयत्न आहेत. विद्याविहार हाऊसिंग सोसायटी मार्फत संस्थेच्या कर्मचार्‍यांना अल्पदरात प्लॉट उपलब्ध करुन देण्यात आल्याने सर्वांनी कमी वयात सुंदर घरे बांधल्याचा आनंद घेतला. संस्थेचे कर्मचारी निवृत्त झाले तरी त्यांच्याशी आमचे कायमस्वरूपी स्नेहसंबंध, ऋणानुबंध राहतील. आपण सर्वांनी आपल्या संस्थेला अजून खूप मोठे करायचे असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षात प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, उपशिक्षक, उपशिक्षिका, बालवाडी शिक्षिका, ग्रंथपाल, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, आश्रमशाळा व्यवस्थापक, लिपीक, लॅब असिस्टंट, स्वयंपाकी, शिपाई असे विविध पदांवर कार्यरत असलेले 44 कर्मचारी सेवानिवृत्त झाले.

या सर्वांचा सत्कार तसेच कोरोना काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आणि हृदयविकारामुळे व अचानक मृत्युमुखी झालेल्या 16 कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांचे सांत्वन संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला संस्थेतील मयत कर्मचारी यांना सामूहिकरित्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक बबनलाल अग्रवाल, कमलकिशोर भंडारी, गोपाल भंडारी, फिरोज काझी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, जाकिर शेख, प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, डॉ.संजय बारी, डॉ.वैशाली पाटील, डॉ.शारदा शितोळे, पी.व्ही. पाटील, आर.बी.पाटील, निश्चल नायर, जे.एल.चौधरी, डॉ. दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेकानंद ठाकरे यांनी केले. तर आभार प्राचार्य निश्चल नायर यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com