राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकार्‍यांनी घेतला पदभार

जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे तर कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे, प्रशांत भदाणे
राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकार्‍यांनी घेतला पदभार

धुळे । Dhule

धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश सोनवणे व जिल्हा कार्याध्यक्षपदी जितेंद्र मराठे आणि प्रशांत भदाणे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (State President Jayantrao Patil) यांनी जाहीर केली. त्यानुसार नूतन जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा आज धुळे येथे पार पडला.

नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे व प्रशांत भदाणे यांना पक्षाचे निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या हस्ते पदभार सोपविण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, एन.सी. पाटील, धुळे शहर जिल्हा अध्यक्ष रणजीत राजे भोसले, धुळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा ज्योती पावरा, रमेश करनकाळ, पंचायत समिती साक्रीचे उपसभापती नरेंद्र मराठे, दिनेश मोरे, डॉ.जितेंद्र ठाकूर, सौ.संजीवनी गांगुर्डे, मनोज महाजन, निखिल पाटील, सागर पाटील, राजेंद्र चितोडकर, रवींद्र देशमुख, शकीला बक्ष, रईस काझी, सरोज कदम,कुणाल पवार, महेंद्र शिरसाट, राजेश बागुल, लक्ष्मण डोमाडे, सयाजी ठाकरे, गिरीष नेरकर, कल्पेश सोनवणे,जयेश साळुंके आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com