वनविभागात नोकरीचे आमिष, साडे चार लाखात गंडा

वनविभागात नोकरीचे आमिष, साडे चार लाखात गंडा

धुळे । Dhule प्रतिनिधी

वनविभागात (forest department) मुलाला (child) नोकरीस (Jobs) लावून देण्याचे आमिष (Bait) दाखवून शेतकर्‍याला (farmer) एकाने साडेचार लाखात फसवणुक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस (Dondaicha police) गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलीप खंडेश्वर कुलकर्णी (रा.तावखेडा, ता.शिंदखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनकर दत्तात्रय कुलकर्णी (रा.घर.नं.283/1 श्रेयस नगर, सोलापूर) याने मुलास वनविभागात नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले. त्यासाठी जुलै 2019 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेळोवेळी पैशांची मागणी केली.

दिलीप कुलकर्णी यांच्याकडून 14 हजार रूपये रोख, त्यांची पत्नी वसुंधरा दिलीप कुलकर्णी यांच्या सेव्हींग खात्यातून आरटीजीएसमार्फत 4 लाख 49 हजार 500 रूपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर नोकरीबाबत जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवून पैसे परत करण्यास नकार दिला. त्यावरून दिनकर कुलकर्णी याच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात भादंवि कलम 420,406 प्रमाणे गुन्ह्या दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com