जामफळची जलवाहिनी ठरणार जीवनवाहिनी

सोनगीरकरांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवीत, अधिकार्‍यांनी केली पाहणी
जामफळची जलवाहिनी ठरणार जीवनवाहिनी

सोनगीर Songir । वार्ताहर

सोनगीर गावाला पाणीपुरवठा Water supply करणार्‍या जलवाहिनीसह सिंचन विहिरी, विद्युत उपकरणे जामफळ धरणाचे Jamphal dam काम जोरात सुरू असल्याने बुडीत क्षेत्रात जाणार आहे. पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद Zilla Parishad पाणी पुरवठा विभागाचे Water Supply Department अधिकारी व पाटबंधारे, विभागाचे अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे Gram Panchayat पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी करून चर्चा केली. त्यामुळे सोनगीरकरांचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सोनगीर मुख्य बाजारपेठेचे गाव असून 25 ते 30 हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाला पाणीपुरवठ्यासाठी जामफळ धरणाच्या परिसरात चार विहीरी बुडीत क्षेत्रात गेल्याने आता एकच विहीर शिल्लक राहिली आहे. त्या विहिरीतून जलवाहिनी द्वारे गावाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी योजना विस्कळीत झाली आहे. सध्या होत असलेले पाण्याचे नियोजन धरणाच्या काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार नाही.

त्यामुळे जो पर्यंत नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होत नाही तो पर्यंत ग्रामपंचायतीची सध्याची सुरू असलेली विहिरी व पाईपलाईनच्या ठिकाणी खोदकाम करण्यात येत असून गावाला पाणीपुरवठा करणार्‍या सिंचन विहीरी जामफळ धरणातील बुडीत क्षेत्रात जाणार आहेत. मोबदल्यात गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा सोडविण्यात येणार आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी एस. बी पडयार, वरीष्ठ भुवैज्ञानिक आर. ओ. बगमार, उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग धुळे एस. ओ. पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता यु. डी. दाभाडे,सरपंच रुख्माबाई गोरख ठाकरे, उपसरपंच प्रतिनिधी धाकूशेठ बडगुजर, ग्रामविकास अधिकारी आर एन कुवर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल कासार, डॉ राहुल देशमुख, शाम माळी, मोहन सैंदाणे, हाजी अल्ताफ कुरेशी यांनी पांझर तलाव, बारी, आंबाखोरा तलावाची पाहणी केली.

ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या नुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तीन वेगवेगळ्या प्रकारचे अंदाजपत्रक तयार करून पाटबंधारे विभागास सादर करावे त्यानुसार योग्य ती योजनेतून पाणी प्रश्न सोडविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com