लोहा गरम हैं, मार दो हथौडा...

पुन्हा कोणाचा जीव जाण्यापूर्वीच हा धंदा हद्दपार करा, एकच प्याला बनावट तर नाहीना, अनेकांपुढे प्रश्नचिन्ह
लोहा गरम हैं, मार दो हथौडा...

चहूबाजूंनी महामार्ग आणि दोन राज्याच्या सीमा लाभलेल्या धुळे जिल्ह्याच्या या भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवत काळा बाजार करणार्‍यांनी इथे चांगलेच बस्तान बसवले. नुकतेच तालुका पोलिसांनी बनावट दारूचा कारखाना नेस्तेनाबूत केला. या कारवाईमुळे मोठ्या कालावधीपासून पडद्याआड असलेला मद्यतस्कर, मद्यसम्राट दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन पुन्हा एकदा समोर आला आहे. याच दिनू डॉनच्या बनावट दारु कारखान्यावर गेल्या काही वर्षापूर्वी जिल्हा पोलिसांनी छापा टाकला होता. तेव्हा केमिकलचा स्फोट होऊन एका पोलीस कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पुन्हा कोणाचा जीव जाण्यापूर्वीच आणखी असे कारखाने शोधून या गोरख धंद्याची पाळेमुळे उखडून काढाच. लोहा गरम हैं, मार दो हथौडा...

राज्य आणि देशभरात धुळे जिल्ह्या या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. जे कोठेही घडत नाही ते धुळ्यात घडते. याचे अनेक उदाहरणे आहेत. ती सांगायची म्हटली तर हा विषय बाजूलाच राहून जाईल. दरम्यान जिल्ह्यात बनावट दारू, अफू, गांजा शेती, सट्टा जुगार, रेशन, गुटखा तस्करी, कत्तलीसाठी गुरांची वाहतूक, गौणखनिज, चोरीच्या ट्रकांची मोडतोड असे अनेक अवैध व्यवसाय चालतात. या सर्वच अवैध व्यवसायांवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आणि ती सतत सुरू आहे. हे कौतुकास्पदच आहे. परंतु या अवैध व्यवसायाच्या मुळासकट जाऊन ते हद्दपार करण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे.

या अवैध व्यवसायांमध्ये अनेक व्हाईट कॉलर लोकही सामील आहेत. तर अनेकांना राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे पोलिसांना ही मर्यादा येतात. कोणाचीही भीडभाड न बाळगता थेट मुळावर घाव घालने गरजेचे आहे. यासाठी जनता ही पोलिसांच्या पाठीशी आहे.

लोहा गरम हैं, मार दो हथौडा...
दुचाकिला धडक देऊन भरधाव क्रुझर उलटली : तीन जखमी

अवैध धंद्यांमध्येही शासकीय महसूल बुडविणारा बनावट दारू हा जीवावर बेतणारा धंदा आहे. याचे उदाहरण आपल्या जिल्ह्यातच आहे. डिसेंबर 2015 मध्ये धुळे तालुक्यातील शिरूड, धामणगाव शिवारातील अवैध दारू कारखान्यावर पोलिस पथकाकडून छापा टाकण्यात आला होता. तेव्हा झालेल्या केमिकलच्या स्फोटात पोलिस कर्मचारी आनंदा माळी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा स्फोटप्रकरणी पोलिसांनी दिनेश गायकवाडसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. पोलीस कर्मचार्‍याच्या मृत्यूमुळे या प्रकरणाला गंभीर स्वरूप आले होते. परंतु त्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून धाडसत्र राबविण्यात आले नाही. आणखी एक उदाहरण म्हणजे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सतर्कतेमुळे दिनू डॉनचा बनावट दारूचा कारखाना उघडकीस आला. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दिनू डॉनसह दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 8 जण अटकेतही आहेत. विशेष म्हणजे या आरोपींनी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा डिस्टिलरी कंपनीच्या दारूचं नाव आणि लोगोचा वापर केला होता. त्यांच्याकडून प्रवरा कंपनीच्या दारुप्रमाणे पॅकिंग केलेला मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. पुन्हा एकदा पोलिसांना दिनू डॉनचे साम्राज्य मिळून आले आहे.

आता हाच कारखाना कधी पासून सुरु होता? त्यांचे जिल्ह्यात आणखी असे किती ठिकाणी कारखाने आहेत? तो कच्चा माल कोठून, कसा आणत होता? तयार केलेला माल कुठे विकत होता? त्याला आणखी कोणा कोणाची साथ आहे? याचा पोलिसांनी खोलात जाऊन तपास करणे गरजेचे आहे. फक्त पोलीसच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकार्‍यांनी देखील चौकशी करणे गरजेचे आहे.

लोहा गरम हैं, मार दो हथौडा...
दोन जुगार अड्डयांवर छापे,9 जण ताब्यात
लोहा गरम हैं, मार दो हथौडा...
धुळ्यात राज्यपाल हटावसाठी राष्ट्रवादीची स्वाक्षरी मोहीम

पोलिसांच्या माहितीनुसार दारू तयार करण्यासाठी स्पिरीट हे गुजरात राज्यातून आणले जात होते. आता गुजरात ते थेट धुळे तालुक्यातील कावठी शिवार यादरम्यान महामार्गावरील पोलिस, चेक पोस्ट, राज्य उत्पादन शुल्क विभाग अशी तटबंदींना छेदून स्पिरीट आणणे म्हणजे दिव्यच आहे. तरीही कावठीच्या कारखान्यात तब्बल 17 लाखांचे स्पिरीट मिळून आले. यापूर्वी अनेकदा ते आणले ही गेले असेल. मोठ्या वरदहस्ताशिवाय एवढी मजल मारता येणे शक्यच नाही. म्हणजेच महामार्गावर आजही स्पिरीटची सर्रास वाहतूक होत असल्याचे स्पष्ट होते. एकूणच पुन्हा एकदा यासह नव्याने होऊ पाहणार्‍या मद्यसम्राटाच्या मुसक्या आवळून त्यांचे साम्राज्य उध्वस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा स्पिरिट आणि बनावट दारूमुळे पुन्हा कोणाचा जीव जाऊ शकतो?

जिल्ह्यात यापूर्वी देखील अनेकदा बनावट दारू आणि स्पिरिट पकडण्यात आले आहे. बनावट दारू ही फक्त देशी नाहीच तर विदेशीही अनेक प्रकारची पकडली आहे. काही देशी-विदेशी बाटल्यांची पॅकेजिंग तर अशी असते कि ती, तिचा खरा मालक ही ओळखू शकणार नाही. बनावट तर विक्रेत्यांना ओरिजनलच्या निम्म्याहून कमी किंमतीत मिळते. झटपट मालामाल होण्याचा हा मार्ग असल्याने हॉटेल, ढाबा आणि अनेक ठिकाणी तिची चलती होते. निवडणुका आणि थर्टी फर्स्टला तर मद्याचा महापूर येतो. जिल्ह्यातील बनावट दारुचे हे प्रस्थ खरोखर उध्वस्त करावयाचे असेल तर केवळ कारखाने सापडवून किंवा वस्तुंची तोडफोड करुन उपयोगाचे नाही. तर यंत्रणेलाही आपल्या आत डोकावून बघाव लागेल.

लोहा गरम हैं, मार दो हथौडा...
मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर
लोहा गरम हैं, मार दो हथौडा...
VISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज
लोहा गरम हैं, मार दो हथौडा...
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

डॉन को पकडना मुश्किल नहीं..

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सुपर हिट डॉन चित्रपटातील ‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है..’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. मात्र चित्रपटात काल्पनिकता असते. वास्तव जीवनात असे घडते असे नाही, कारण एका छोट्याशा गावातून छोट्याशा व्यवसायात जगलरी करणारा दिनेश गायकवाड याचे प्रस्थ इतके वाढले की, तो अवैध धंद्यामधील ‘डॉन’ म्हणून ओळखला जावू लागला. यापुर्वी देखील पोलिसांनी या दिनू डॉनच्या अनेकदा मुसक्या आवळल्या आहेत. तरीही त्याचे व्यवसाय बंद होत नाहीत. उलट तो पुर्वीपेक्षा अधिक ताकदीने व्यवसायात पुढे येतो. आता त्याचा करोडोचा कारखाना उध्वस्त झाला. या डॉनला पकडणे पुन्हा पोलिसांसाठी मिश्कील नाही. पण त्याचे अवैध विश्व उध्वस्त करणे नामुमकिन ठरु नये.

लोहा गरम हैं, मार दो हथौडा...
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com