उड्डाण पुलावर दरोडा टाकणार्‍या टोळीस अटक

साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
उड्डाण पुलावर दरोडा टाकणार्‍या टोळीस अटक

धुळे । dhule

शहराजवळील मुंबई-आग्रामार्गावर वरखेडी उड्डाण पुलाच्या खाली चालक व सहचालक यांना ट्रकच्या कॅबीनमधून खाली उतरवून चाकूचा, लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याचा व मिरचीची पावडर डोळयात टाकण्याचा धाक दाखवून मारहाण करुन दोरीने हात बांधून रोख 8600 रूपये व 23 हजार रुपये किंमतीचे दोघांचे मोबाईल जबरीने चोरुन नेले.

मुंबई-आग्रामार्गावरील वरखेडी उड्डाण पुलाच्या खाली धुळ्याकडून शिरपूरकडे जाणार्‍या सर्व्हिसरोडने ताहीर खान रियाजू खान रा बलखंड, (म.प्र) हा औरंगाबाद येथून आयशर ट्रक क्र.एम.एच.-18/बी.एच.-2400 मध्ये औषधी माल भरुन इंदूर येथे जात असतांना उड्डाण पुलाच्या खाली एक महिला व दहा ते अकरा पुरुषांंनी ताहीर खान व सहचालक फरदीन खान फर्याद खान यांना ट्रकच्या कॅबीनमधून खाली उतरवून चाकूचा, लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याचा व मिरचीची पावडर डोळयात टाकण्याचा धाक दाखवून मारहाण करुन दोरीने हात बांधून रोख 8600 रूपये व 23 हजार रुपये किंमतीचे दोघांचे मोबाईल जबरीने चोरुन नेले.

याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात ताहीर खान रियाजू खान यांनी फिर्याद दिली. त्यावरून भादंवि 395 प्रमाणे सातजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा करतांना वापरलेला चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, व चार मोटार सायकली असा एकूण एक लाख 41 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांनी यापुर्वी देखील महामार्गावर अशाच प्रकारे केलेले गुन्हे उघडकीस येतील तसेच इतर फरार झालेल्या आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक, किशोर काळे, सहा. पोलीस अधिक्षक प्रदिप महिराळे, यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, सपोनिरी दिपक पावरा, महिला पोसई लक्ष्मी करनकाळ, हेकॉ शकील शेख, हेकॉ प्रकाश माळी, हेकॉ आरीफ सैय्यद, पोना राजेंद्र ढिसले, पोना योगेश शिंदे, पोना संदीप कढरे, चालक पोकॉ संतोष घुगे, पोकॉ शोहेब बेग, पोकॉ आतिक शेख, पोकॉ एस.एन.मोरे, पोकॉ एस.पी. शेंडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com