पुण्यातील बिल्डरला लुटणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, साडेपाच लाखांची रोकड हस्तगत
पुण्यातील बिल्डरला लुटणारी टोळी गजाआड

धुळे । Dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील छडवेल शिवारात कॉपर केबल खरेदीसाठी (Buy copper cable) बोलावून पुण्यातील बिल्डरला (Builder) लुटणार्‍या टोळीला (gang) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने बेड्या ठोकल्या (shackles hit) आहेत. त्यांच्याकडून साडे पाच लाखांची रोकड व मोबाईल असा सहा लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे येथील रिअल ईस्टेट व्यावसायीक (Real Estate Professiona) दसमेल सुखविंदर कालरा (Dasmel Sukhwinder Kalra) यांना दि. 27 मार्च रोजी सागर पाटील, महेश पाटील व राजेंद्र पाटील यांनी त्यांचे इतर साथीदारांसह कॉपर केबल ((Buy copper cable)) घेण्यासाठी छडवेल शिवारातील सुझलॉन कंपनीचे पाठीमागे पैश्यासह बोलावून त्यांना मारहाण (Beating) करुन त्यांचे कडील 40 लाखांची रोकड बरदस्तीने हिसकावुन पळुन गेले. याबाबत निजामपुर पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडुन (Local Crime Branch) सुरु असतांना हा गुन्हा आरोपी नवरत पवार (Accused Navrat Pawar) याने सागर पाटील असे बनावट नावाचे फेसबुक अकाऊन्ट तयार करुन त्यावर कॉपर वायरचे (copper cable) फोटो टाकुन कॉपर वायर विकण्यासाठी संपर्क क्रंमाक देवुन श्री. कालरा यांना खरेदी करण्यासाठी आकर्षित केले. तर इकबाल चव्हाण (बनावट नाव राजेंद्र पाटील), कृष्णा भोसले (बनावट नाव महेश पाटील) व इतर साथीदार यांचे मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

गुन्हयाचा समांतर तपास करतांना वरील आरोपींनी बारडोली येथुन कार मेळाव्यातुन शेवरलेटस कंपनीची कार (क्र. जी.जे. 19 ओ.एम.-406) कार खरेदी करुन राजस्थान (Rajasthan) राज्यात पळुन गेले असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत (Police Inspector Shivaji Budhwant) यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि प्रकाश पाटील, पोसई योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी यांचे वेगवेगळे पथक नेमुन आरोपीतांचा शोध सुरु केला.

तसेच पथकाकडुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या (Confidential information) आधारे तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी हे त्या कारने चोपडाकडुन शिरपुरकडे येत असल्याचे समजले. पथकांनी आज दि. 1 रोजी 11 वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपुर गावाचे पुढे असलेल्या चोपडा फाटयावरील हॉटेल सहास येथे सापळा रचला. कारला अडथळा करुन थांबविले. खात्री केली असता त्यामध्ये तीन इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी इकबाल जाकीट चव्हाण (रा. जामदा ता. साक्री), कृष्णा अशोक भोसले (रा. जामदा ता. साक्री), नुरआलम महोम्मद युसूफ सैय्यद (रा. घर नं. 57, ग.नं. 2, मारोती नगर, लिंबायत सुरत, गुजरात) असे सांगितले. चौकशीत त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन त्यांची अंगझडती घेतली असता 5 लाख 47 हजार रुपये रोख व 55 हजार 999 रुपये किंमतीचे 5 मोबाईल असा एकुण 6 लाख 2 हजार 999 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला.

त्यांच्या जप्त मोबईलचे निरीक्षक केले असता त्यात कॉपर केबल, गांडुळ व पैसे पाडावयाचे भोपळा व इतर प्रकारचे लोकांची फसवणुक करणारे व्हीडीओ व फोटो दिसत असून ते अशा प्रकारचे फसवणुक (Fraud) करीत असल्याचे दिसुन आले. तिघांना पुढील तपासासाठी निजामपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ह कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, पोसई योगेश राऊत, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ संजय पाटील, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, प्रकाश सोनार, संदीप सरग, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, योगेश चव्हाण, राहुल सानप, गौतम सपकाळे, चेतन कंखरे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, मयुर पाटील, किशोर पाटील, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, अमोल जाधव चालक विलास पाटील, कैलास महाजन यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.