वनविभागाने मैंदाणे परिसरात फिरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा

आ. मंजुळा गावीत यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
वनविभागाने मैंदाणे परिसरात फिरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा

धुळे । Dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील मैंदाणे परिसरात (Maindane area) फिरत असलेल्या बिबट्यांचा (leopards) वनविभागाने बंदोबस्त (forest department) करावा. तसेच दहिवेल 33/11 के.व्ही.उपकेंद्रावरुन मैंदाणे, बोदगांव, चिचपाडा या परिसरात चोवीस तास विजपुरवठा (Power supply) करावा, अशी मागणी आ.सौ.मंजुळा गावीत (MLA Manjula Gavit) यांनी प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या दहा दिवसापासून मैंदाणे परिसरात (Maindane area) पट्टेदार बिबट्यासह (leopards) त्यांच्या संपुर्ण कुटूंबाचा वावर सुरु आहे. आता पर्यंत तीन ते चार पाळीव जनावरांवर प्राणघातक हल्ला झालेला आहे. करमसिंग वंजारी व रामय्या वंजारी यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन ठार मारले आहे. एक बिबट्या पिण्याच्या पाण्याच्या शोधात धवळी विहीर गावातील शेतकरी रमेश पवार यांच्या शेतातील विहीरीत पडला.

वन विभागाने पिंजरा लावून बिबट्या (leopards) सुरक्षित बाहेर काढून धुळे तालुक्यातील लळींग परिसरातील वन क्षेत्रात सोडले. अजून बिबट्याची मादी व तीन ते चार मोठे बछडे या परिसरात फिरत आहेत. या बिबट्यांच्या धाकाने शेतकरी दिवसा-रात्री शेतात पिकास पाणी देण्यासाठी जाण्यास घाबरत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान (Damage to farmers' crops) होऊन त्यांना आर्थिक फटका बसत आहे. ग्रामस्थ दिवसादेखील गावात फिरत नाहीत. मैंदाणे परिसरात फिरत असलेल्या बिबट्याने वनविभागाच्या कर्मचार्‍यांना देखील दुपारच्या सुमारास दर्शन दिले आहे. पशुधनावर किंवा मनुष्य वस्तीवर बिबट्यांनी हल्ला करु नये, यासाठी मैंदाणे परिसरात फिरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त वनविभागाने (forest department) करावा.

तसेच शेतशिवारास पाणी पुरवठा करण्यासाठी दहिवेल 33/11 के.व्ही.उपकेंद्रावरुन मैंदाणे, बोदगांव, चिचपाडा या परिसरात चोवीस तास विजपुरवठा (Power supply) करावा, अशी मागणीही आ. सौ. गावीत यांनी केली आहे. मागणीचे पत्र जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक व विज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभिंयत्यांना देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.