धुळ्यात निलंबनाचे आदेश घेण्यासाठी गेलेल्या चालकाची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

धुळे विभागातून 210 कर्मचारी निलंबित
धुळ्यात निलंबनाचे आदेश घेण्यासाठी गेलेल्या चालकाची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

धुळे । Dhule। प्रतिनिधी

धुळे आगारातील चालक (Dhule depot driver) निलंबनाचे आदेश (Suspension order) घेत असतांना त्यांना चक्कर आला व त्यांची प्रकृती खालावली.(Nature deteriorated) त्वरीत जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल (Admitted) करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. दरम्यान आज धुळे विभागातून 210 कर्मचार्‍यांना निलंबित (Employees suspended) करण्यात आले.

परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा समावेश शासनात करण्यात यावा यासाठी गेल्या 21 दिवसांपासून कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी विलगीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. या कर्मचार्‍यांना संप मागे घेवून त्वरीत कामावर रुजू होण्याचा आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. परंतू परिवहन मंत्र्यांचा आदेश धुडकावून कर्मचार्‍यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.

आज धुळे आगारातील 36 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. या कर्मचार्‍यांना आगारप्रमुख अनुजा दुसाणे यांनी निलंबनाचे आदेश पारित केले. त्यांच्या कॅबिनमध्ये चालक मनोहर भास्कर पाटील हे निलंबनाचे आदेश घेण्यासाठी गेले तेथेच त्यांना चक्कर आला. त्वरीत 108 रुग्ण वाहिका बोलावून त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

धुळे विभागातून आतापर्यंत 270 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात आज 210 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर धुळे आगारातून आज 36 कर्मचारी निलंबित करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com