सुलवाडे - जामफळ प्रकल्प निर्मितीचे स्वप्न लवकरच होणार साकार

आ. जयकुमार रावल; पिंपरखेडा, धांदरने, निरगुडी येथे फिल्टर पाणी प्रकल्पाचा शुभारंभ
सुलवाडे - जामफळ प्रकल्प निर्मितीचे स्वप्न लवकरच होणार साकार

शिंदखेडा Shindkheda । प्रतिनिधी

सुलवाडे - जामफळ उपसा जलसिंचन योजना (Sulwade - Jamphal Upsa Irrigation Scheme) सन 1999 मध्ये मंजूर झाली होती. परंतु त्याकडे तत्कालीन सरकारने दुर्लक्ष केले होते. सन 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची (BJP) सत्ता स्थापन झाल्यानंतर सुलवाडे -जामफळ योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेर या योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 2400 कोटींचा निधी (fund of crores) दिला. त्यामुळे आता स्वप्न साकार होणार असल्याचे प्रतिपादन आ. जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांनी केले.

पिंपरखेडा, धांदरने, निरगुडी या ठिकाणी आ. जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने नवीन फिल्टर पाणी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलतांना आ. रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती असणारा तालुका होता. पण आज अमरावती प्रकल्प, वाडी शेवाडी प्रकल्प, तापी नदीवरील सुलवाडे आणि सारंगखेडा बरेज आणि सुलवाडे जामफळ उपसा योजनेचे अत्यंत वेगाने काम सुरू आहे.

त्यामुळे तालुका सर्वात बागायतदार तालुका म्हणून पुढील काळात ओळखला जाईल, सिंचनासोबत आपण 5000 शेतकर्‍यांना सिंचन विहिरी, रस्ते, नरडाना एम आय डी सी मध्ये नवनवीन उद्योग अशी सर्वार्थाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहोत, अडीच वर्षात मागील सरकारने आपल्या तालुक्यावर अन्याय केला होता तो आता दुर करण्यासाठी प्रयत्न राहील. आता मागील काळात जवळपास 30 पेक्षा अधिक गावांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर्स प्लॅन दिले होते.

पुढील काळात नवीन 50 गावांना हे प्लॅन देऊन शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न आहे. पण जे स्वप्न आपल्या वडील आणि आजोबांनी पाहिले होते ते सुलवाडे - जामफळ योजनेचे काम लवकरच मार्गी लावून माझा शब्द खरा करून दाखविणार असल्याचे आ. जयकुमार रावल यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, सभापती वंदना ईशी, संजीवनी सिसोदे, जि. प. सदस्य पंकज कदम, देविदास पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. रमेश खैरनार, भारत ईशी, पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे, पिंपरखेडा सरपंच विकास पाटील, उपसरपंच ज्योती खैरनार, लखन रुपनर, वाघोदेचे सरपंच श्री. वाघ, डॉ. नितीन चौधरी, डॉ. बोरसे, माजी सरपंच साहेबराव खैरनार, साहेबराव पाटील, धांदरणे सरपंच रंजिता रविंद्र गिरासे, धनसिंग गिरासे, विठ्ठलसिंग गिरासे, जयसिंग गिरासे, केसरसिंग गिरासे, सुभाष संकलेचा, सखाराम पाटील, मनोज ठाकरे, उपसरपंच योगिता गिरासे, नारायण गिरासे, जितेंद्र गिरासे, निरगुडीचे सरपंच खडकसिंग गिरासे, उपसरपंच भरतसिंग गिरासे, माजी सरपंच सुभाष गिरासे, गुलाबराव पाटील, ताराचंद माळी, सदस्य देवीसिंग गिरासे, भाऊसाहेब गिरासे, राजधर पाटील, संजय पाटील, सुडवदचे सरपंच मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com