रात्री 9 पर्यंतच ‘डीजे’ चा दणदणाट

डीजे चालक व मालकांच्या बैठकीत पोलीस यंत्रणेची सूचना
रात्री 9 पर्यंतच ‘डीजे’ चा दणदणाट

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरात रात्री 9 वाजेनंतर (After 9 p.m.) कोणीही डीजे वाजवू नये (Don't play DJ), मंदिरांजवळ तसेच धार्मिक कार्यक्रमांत आक्षेपार्ह गाणे (Offensive song) लावू नयेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे (Supreme Court orders) डीजे चालकांनी पालन करावे, अशा सूचना आज शहर पोलिस ठाण्याचे (City Police Station) पीआय नितीन देशमुख, पीआय आनंद कोकरे, पीआय निकम यांनी डीजे चालकांच्या बैठकीत दिल्या.

बैठकीस डीजे चालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात अनेक ठिकाणी रात्री उशीरापर्यत डीजे वाजविला (play DJ) जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांनाही त्रास होतो. तसेच आता डीजे रात्री 9 वाजेपर्यतच परवानगी पोलिस प्रशासनाने (Police administration) बैठकीत दिल्या.

गाणे लावण्यावरुन व नाचण्यावरुन वादही होतात. याबाबत पोलिसांकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आज पोलिस प्रशासनाने डीजे चालक व मालकांची बैठक घेवून त्यांना विविध सूचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, आनंद कोकरे व श्री.निकम उपस्थित होते.

शहरात कायदा व सुव्यवस्था (Law and order) राखण्यासाठी सर्व डीजे चालकांनी पोलिसांना सहकार्य करावे. शहरात यापुढे रात्री 9 वाजेनंतर कोणीही डीजे वाजवू नये. कोणी कितीही आग्रह केला तरी 9 वाजता डीजे (dj) बंद झालाच पाहिजे. तसेच मंदिरांजवळ व धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवू नये. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court orders) घालून दिलेल्या डिसेबल मर्यादेचे पालन करावे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाई (Action) केली जाईल, असा इशाराही दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com