....अन् जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना  दिली शाबासकीची थाप

....अन् जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना दिली शाबासकीची थाप

धुळे येथील एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलमध्ये विज्ञान व कलाधारा प्रदर्शन

धुळे Dhule। प्रतिनिधी

येथील एसव्हीकेएम सीबीएसई स्कूल (SVKM CBSE School) मध्ये विज्ञान प्रदर्शन (Science Exhibition) व कलाधारा प्रदर्शनात (Art Exhibition) विद्यार्थ्यांची गुणवत्ता (quality of the students) त्यांचे प्रेझेंटेशन पाहून जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप (pat on the back) दिली.

श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित धुळे येथील एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलमध्ये ङ्गइंटरप्राईज प्रोजेक्ट अंतर्गत विज्ञान प्रदर्शन व चित्रकला विषयअंतर्गत कलाधारा प्रदर्शन भरविण्यात येऊन दोन दिवस या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी एसव्हीकेएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर गोयल, एसव्हीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे, संजय अग्रवाल, अजय अग्रवाल, संतोष अग्रवाल व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा मेनन उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

चित्रकला प्रदर्शनात इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील प्रमुख पाच राज्यातील (महाराष्ट्र, गुजरात, केरळ, बंगाल, पंजाब) विविध कला, खाद्य संस्कृती, वेशभूषा, प्रसिद्ध ठिकाणे, सण-उत्सव कशा पद्धतीने साजरे करण्यात येतात याचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कला इतक्या हुबेहूब व बोलक्या होत्या की प्रत्यक्षदर्शी पाहतांना जणू आपण त्या राज्यांमध्येच फिरत आहोत असा अनुभव आला.

कलाधारा प्रदर्शन तसेच नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात इयत्ता पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी निसर्गास हानिरहित, पर्यावरण अनुकूल आणि शाश्वत विकासावर आधारित एकूण 200 प्रतिकृती तयार केल्या होत्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा मेनन व विज्ञान विषय शिक्षिका सणा देशमुख, कलाशिक्षक संजय गलवाडे, वर्षा सूर्यवंशी, अमेरा अन्सारी, पालक, शाळेतील सर्व वर्गशिक्षक, विषय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील नियती अग्रवाल, राजवर्धन पाटील यांनी केले. स्वागतगीत सुरेखा गुजर, मोनाली पांडे, जीवन पाटील व विद्यार्थिनी यांनी सादर केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com