
धुळे - प्रतिनिधी dhule
कॉलेजला (College) जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या तरूणाचा डेडरगाव तलावात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मोहम्मद रेहान इंद्रीस अन्सारी (वय 24 रा.मदीना पार्क रातराणी हॉटेज जवळ, धुळे) असे त्याचे नाव आहे. तो सकाळी 9 वाजता दुचाकीने कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाला. पंरतू सायंकाळी उशिरापर्यंत घरी आला नाही.
महाविद्यालयासह परिसरात शोध घेवूनही मिळून आला नाही. याबाबत चाळीसगाव रोड पोलिसात मिसिंगची तक्रार देखील देण्यात आली. मित्र, नातेवाईक शोध घेत डेडरगाव तलावापर्यंत गेले असता तलावात त्याचा मृतदेह मिळून आला. दुसर्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत मोहाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.