दप्तरामध्ये फेरफार ; ग्रा. पं. लिपिकास अटक

दप्तरामध्ये फेरफार ; ग्रा. पं. लिपिकास अटक

पिंपळनेर । वार्ताहर dhule

येथील ग्रामपंचायत मधील लिपिकाने नमुना नंबर आठ दप्तरात फेरफार करून तहसील कार्यालयाची नियोजित भूखंडावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

भरत साळुंखे याला शासकीय वसुली व पाणी वाटप कामासाठी नेमणूक केली होती. त्याने आपल्या लिपिक पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायतीची कुठलीही पूर्वसंमती न घेता नमुना नंबर आठमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर फेरफार करून बनावट सही व शिक्का मारून पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बाजीराव जगताप यांनी पिंपळनेर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भरत साळुंखे विरोधात भादंवि 420, 467, 468, 471, 465, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून त्यास साक्री न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याचा जामीन नाकारून त्याची जिल्हा कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com