केंद्रीय पथकाने केली सहा तास उपजिल्हा रुग्णालयाची चौकशी

केंद्रीय पथकाने केली सहा तास उपजिल्हा रुग्णालयाची चौकशी

दोंडाईचा Dondaeca । श. प्र.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) (एनएचएम) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची (various schemes) तपासणी (Inspection) करण्यासाठी केंद्र सरकारच्या (Central Govt) दोन प्रतिनिधीचा समावेश असलेले कॉमन रिव्ह्यू मिशनचे पथक (Team of Common Review Mission) जिल्हा दौर्‍यावर आले आहे. या पथकाने दि. 8 रोजी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, (Health officials,) कर्मचार्‍यांची बैठक (meeting) घेऊन आढावा घेतला. त्यानंतर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाची पाहणी केली. दरम्यान केंद्रीय पथक उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospital) तब्बल सहा तास विविध विभागाची प्रत्यक्ष व बैठक घेऊन तपासणी (Inspection) करून चौकशी केली. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारी चांगलेच दमछाक होतांना दिसून आले.

केंद्रीय पथकाने केली सहा तास उपजिल्हा रुग्णालयाची चौकशी
पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे संतप्त; बैठकीतून घेतला काढता पाय

केंद्र शासनाकडून सन 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) सुरू केले. या अभियानांतर्गत माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मलेरिया व डेंग्यू आजार थोपविण्यासाठी काम होत आहे. महिला व मुलांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. ग्रामीण भागातील मुलांचे लसीकरण व शहर नियंत्रण यास विविध आरोग्य विषयी बाबींवर लक्ष दिले जात आहे शिवाय आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी देखील होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राचे सीआरएमचे पथक मंगळवारी दाखल झाले. यावेळी आरोग्य विभागातर्फे पथकातील अधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले.

केंद्रीय पथकाने केली सहा तास उपजिल्हा रुग्णालयाची चौकशी
बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा

केंद्र स्तरावरून आलेल्या या पथकाच्या समवेत राज्यातील अधिकार्‍यांचा देखील समावेश आहे. केंद्रीय पथकाने उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. विविध कक्षांना प्रत्यक्ष भेट दिली. ओपीडी कक्ष, आयपीडी कक्ष, शस्त्रक्रिया विभागाची पाहणी केली. शासनाच्या मानांकनुसार अंमलबजावणी होते किंवा कशी याचीही पडताळणी केली. तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेले सिकलसेल कक्ष, क्षयरोग विभाग, कुष्ठरोग विभाग, एचआयव्ही एड्स निर्मूलन कार्यक्रमाची माहिती घेतली. दरम्यान ही तपासणी सकाळी दहा वाजेपासून आलेले केंद्रीय पथक दुपारी तीन वाजेला रवाना झाले.

तब्बल सहा तास ही तपासणी सुरू होती. केंद्रीय पथक प्रमुख डॉ. ए एम कादरी, डॉ. उमेश बावसकर, राज्याचे आरोग्य संचालक डॉ. प्रकाश पाडवी, संजय शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारीनिलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश भडांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार चंद्रे यासह आदी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने केली सहा तास उपजिल्हा रुग्णालयाची चौकशी
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

याच दरम्यान जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती महावीरसिंह रावल, जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र गिरासे, माजी नगरसेवक जितेंद्र गिरासे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत करून दोंडाईचा शहरासह परिसरातील समस्या मांडल्या. त्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 102 क्रमांकाची रुग्णवाहिकांची अवस्था बिकट झाली असून प्रत्येक आरोग्य केंद्रांना अद्यावत रुग्णवाहिकांची गरज असल्याची पथकाच्या लक्षात आणून दिले. तसेच दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाला 108 क्रमांकाची अजून एक रुग्णवाहिकेची मागणी आरोग्य सभापती श्री. रावल यांनी केली. त्यावर केंद्रीय पथकातील डॉ. कादरी यांनी नोंद घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com