बुराई धरण 100 टक्के भरले

बुराई धरण 100 टक्के भरले

ग्रामस्थांनी केले पूजन

निजामपूर - Dhule - Nijampur - वार्ताहर :

साक्री तालुक्यातील व माळमाथा भागातील बुराई धरण 100 टक्के भरले असून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. यामुळे फोफादे ग्रामस्थांनी धरणातील पाण्याची पूजा केली आहे.

माळमाथा भागातील खुडाने व ब्राम्हणवेल परिसरात गेल्या 8 ते 10 दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या भागातील बुराई आणि रोहिणी या दोघेही नद्यांना पूर आलेत. यामुळे नद्या, नाले, खळखळून वाहत आहेत.

या पावसामुळे मालमाथा भागातील संजीवनी प्रकल्प म्हणून ओळख असणार्‍या बुराई प्रकल्प हा 100 टक्के भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. बुराई धरण आणि धरणातील पाण्याचे साडी चोळीने फोफादे ग्रामस्थांनी पूजन केले. याप्रसंगी पोलीस पाटील, राजेंद्र भदाणे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र भदाणे, माजी सरपंच नगराज बेडसे, ताराचंद भदाणे, भुरू आप्पा, विकास देवरे, राकेश बेडसे, किशोर बोरसे, उमेश भदाणे, संदेश भदाणे आदी ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.

हे धरण भरल्याने परिसरातील निजामपूर, आखाडे, फोफादे, दुसाने तसेच लगतच्या शिंदखेडा तालुक्यातील अनेक भागांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यामुळे परिसरातील शेतीलाही पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com