धुळे जिल्ह्यात 797 शाळांच्या आज घंटा वाजणार

एका बेंचवर एकच विद्यार्थी, 50 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थितीचे नियोजन
धुळे जिल्ह्यात 797 शाळांच्या आज घंटा वाजणार
५ वी चा वर्ग (प्रतिनिधीक छायाचित्र)

धुळे Dhule । प्रतिनिधी

कोरोना (Corona) महामारीमुळे दीड वर्षांपासून बंद (bundh) असलेल्या शाळांची घंटा (School bells) उद्या दि. 4 ऑक्टोबर रोजी वाजणार आहे. शाळेत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाही. त्याबाबत शिक्षण विभागाने (Department of Education) शाळांना निर्देश दिले आहेत.

राज्य शासनाने कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरु होवूनही शाळांच्या घंटा वाजल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात होते. परंतू विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या त्यामुळे शासनाने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात शहरी भागातील आठवी ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या 132 आणि ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या 665 अशा 997 शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे सर्व शाळा निर्जंतूकीकरण करण्यात आल्या आहेत. शाळेत रोज 50 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील. एका बेंचवर फक्त एकच विद्यार्थी बसेल असे नियोजन करण्यात आले आहे. शाळेत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाही. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमती पत्र देणे बंधनकारक आहे. संमती पत्र असल्याशिवाय विद्यार्थी शाळेत बसू दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे आवश्यक राहिल तसेच सोशल डिस्टन्सही पाळावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.