खड्यांचा बसतोय दणका, अन ढिला होतोय मणका

दोंडाईचा ते मालपुर रस्त्यावरील स्थिती
खड्यांचा बसतोय दणका, अन ढिला होतोय मणका

मालपूर Malpur । वार्ताहर

दोंडाईचा (Dondaicha) ते मालपुर (Malpur) या एक किलोमीटरच्या रस्त्यांची (Roads) अतिशय दुरावस्था (Bad situation) झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता, असा प्रश्न वाहनधारकांना (Vehicle owners) पडतो. याकडे मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.

दोंडाईचा ते मालपुर प्रवास करणारे प्रवाशी या खड्डेमय रस्त्याला कंटाळले आहेत. स्थानिक प्रतिनिधीही याकडे लक्ष देत नाहीत. ही देखील खंत आहे. रोटरी स्कुलपासुन ते फॉरेस्ट पर्यंतचा रस्त्यावरून वाहन चालविणे देखील कठीण झाले आहे.

या रस्त्यावरून सतत प्रवास केल्यामुळे आता मणक्याचा आजार जाणवत असल्याची तक्रार खाजगी वाहनधारक अनिल कोळी, संतोष मोरे, प्रदिप अहिरे, रिक्षा चालक वाहकचे अध्यक्ष दौलत मंगा माळी आदींनी देशदूतशी बोलतांना सांगितले. रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती करावी, अन्यथा रास्तारोको करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com