तहसीलदार विनायक थवील यांना अटक

25 हजारांची लाचेची मागणी भोवली, दोघांवर गुन्हा
तहसीलदार विनायक थवील यांना अटक

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

शेतजमिन भोगवटादार (Agricultural land occupants) वर्ग-1 होण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणाचा चौकशी अहवाल (Inquiry report) जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's office) पाठविण्यासाठी 25 हजार रूपये लाचेची मागणी (Demand for bribe) केल्याप्रकरणी अप्पर तहसीलदार विनायक थवील (Upper Tehsildar Vinayak Thaveel) यांच्यासह खाजगी व्यक्तीवर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. एसीबीने थवील यांना अटक (arrested) केली आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील तक्रारदाराने मौजे ठोलीपाडा येथे नवीन अविभाज्य शर्तीच्या शेत जमिनीचा खरेदीचा व्यवहार रजिस्टर सौदा पावतीने केला आहे. या शेतजमिन भोगवटादार वर्ग-1 होण्यासाठी शेतजमिनीचे मालक यांनी दि.23 सप्टेंबर 2021 रोजी पिंपळनेर तहसील कार्यालयाचे अपर तहसिलदार विनायक सखाराम थवील यांच्याकडे अर्ज केला होता.

या प्रकरणात थवील यांनी दि.4 मे 2022 रोजी सातबारा उतारे व नोंदी सादर केलेल्या नाहीत, हे कारण दाखवून प्रकरण तृर्तास निकाली काढले होते. त्यांनतर तक्रारदार यांनी प्रकरणातील कागदपत्राची पुर्तता करून वेळोवेळी विनायक थवील यांची भेट घेतली. त्यांनी प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने दुरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Bribery Prevention Department) पिंपळनेर येथे जावुन तक्रारदाराची तक्रार नोंदवुन घेतली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने दि.8 जुन 2022 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान तहसिलदार विनायक थवील यांनी खाजगी व्यक्ती संदीप मुसळे यांच्यामार्फत तडजोडीअंती 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु त्यांना तक्रारदाराबाबत शंका आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. तहसिलदार विनायक थवील यांनी खाजगी व्यक्ती संदीप मुसळे यास प्रोत्साहीत करून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशिर मार्गाचा अवलंब करून अनाधिकाराने पदाचा दुरुपयोग केला म्हणून तहसीलदार थवील व खाजगी व्यक्ती मुसळे यांच्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम व 7 अ प्रमाणे गुन्हा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, गायत्री पाटील, भुषण शेटे, संदीप कदम, संतोष पावरा, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com