शिंदखेडा येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा

रिपाईची मागणी; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले निवेदन
शिंदखेडा येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा

शिंदखेडा Shindkheda । प्रतिनिधी

शिंदखेडा रेल्वे स्थानकावर (train station) सुपरफास्ट गाड्यांना (superfast trains) थांबा मिळावा, (Get a stop) यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) शिंदखेडा शाखेतर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांना दोंडाईचा येथे निवेदन (Statement) देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, शिंदखेडा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी दिवाणी व फौजदारी न्यायालय, तहसील प्रशासकीय कार्यालय, नगरपालिका, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, शैक्षणिक संकुल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टींनी अतिशय महत्त्वाचे आहे. सुमारे चारशे मुला-मुलींचे निवासी वस्तीगृह शहरात आहे. तसेच या तालुक्याची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार असून तालुक्यात सुमारे 148 गावे येतात. शिंदखेडा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे 60 ते 70 गावांचा दररोज संपर्क येत असतो.

शिंदखेडा रेल्वे स्थानक साक्री, शिरपूर, खेतिया अशा विविध विभागातील नागरिकांसाठी अतिशय जवळचे स्थानक असल्याने भागलपूर-सुरत-भागलपुर रेल्वे गाडी क्रमांक 091 47/09148, पुरी-अहमदाबाद, बरौनी-अहमदाबाद गाडी क्रमांक 02843-02844 व अहमदाबाद बरौनी- अहमदाबाद- गाडी क्रमांक 094 83 /094 84 या दोन्ही एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा गरजेचा आहे. तसेच खानदेशवासीयांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत आवश्यक खानदेश एक्सप्रेसच्या वेळेतही बदल करून ही रेल्वे नियमित करावी.

नंदुरबार रेल्वे स्टेशनला सुपरफास्ट गाड्यांना थांबा आहे. नंदुरबार जिल्हा वेगळा असून त्या ठिकाणी गाडी थांबते. परंतु शिंदखेडा येथे थांबत नाही. म्हणून ही बाब अन्यायकारक आहे. तरी शिंदखेडा येथेही सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तरी लवकरात लवकर सुपरफास्ट गाडी शिंदखेडा येथेही थांबावी, अशी मागणी रिपाईकडून करण्यात आली आहे.

निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, तालुकाध्यक्ष कैलास आखाडे, तालुका उपाध्यक्ष संजय कुवर, ईश्वर आखाडे, माजी प्राचार्य प्रा. प्रदीप दीक्षित, भाजपा प्रवासी आघाडी तालुकाध्यक्ष गोविंद मराठे, भाजपा उपाध्यक्ष अ‍ॅड.पंकज पाटोळे, प्रा.भैयाकुमार मंगळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. प्रसंगी किरण पाटोळे, युवा नेता सुभाष पानपाटील, उमाकांत पाटोळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com