पिंपळनेर येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पिंपळनेर येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पिंपळनेर । वार्ताहर dhule

येथे तरुण शेतकर्‍याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे गावात शोककळा पसरली.

हर्षल ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय 27) असे त्याचे नाव आहे. हर्षलचे वडिलांना पॅरालिसिसचा झटका येऊन ते घरीस उपचार घेत आहेत. हर्षल हा घरात मोठा असल्याने त्याच्यावर घरची जबाबदारी होती. स्वतःजवळ असलेली वाकदर शिवारातील शेती तो करत होता. त्याने सोयाबीनची पेरणी केलेली होती. हर्षल हा घराजवळच मित्रांमध्ये फिरत असे. तो काल रात्र होऊनही घरी न आल्याने कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरू होता. आज सकाळी 7 वाजता एका मजुराला हर्षल हा शेतात झाडाला गळफास घेतलेला अवस्थेत दिसल्याने त्याने तात्काळ परिसरातील शेतकर्‍यांना फोनवरून माहिती दिली. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. हर्षलने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. हर्षल हा बाजीराव गांगुर्डे यांचा नातू, अरुण गांगुर्डे व शाळीग्राम गांगुर्डे यांचा पुतण्या तर ज्ञानेश्वर गांगुर्डे यांचा मु

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com