जिल्ह्यात वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनींनी केले पूजन

एकविरा देवीला 200 किलो आंब्यांचा भोग, पालखी सोहळा, एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी गर्दी
जिल्ह्यात वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनींनी केले पूजन
विधिवत वटवृक्षाचे पुजन करतांना महिला

धुळे Dhule। प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात वटपौर्णिमा (Vatpoornime) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुहासिनींनी (Suhasini) विधिवत वटवृक्षाचे पुजन (Worship of the banyan tree) करुन पतीला दिर्घ आयुष्य (Husband's long life) लाभावे म्हणून आराधना केली. दरम्यान पौर्णिमेनिमित्त शहरातील खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीला (Kulaswamini Ekvira Devi) 200 किलो आंब्यांचा भोग (Mango indulgence) चढविण्यात आला. तसेच आरासही करण्यात आली. एकविरा देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

एकविरा देवीला 200 किलो आंब्यांचा भोग
एकविरा देवीला 200 किलो आंब्यांचा भोग

कोरोनानंतर अडीच वर्षांनी सण, उत्सव साजरे केले जात आहे. भाविक देखील मोठ्या संख्येने दर्शनाला येत असून आज कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे श्री एकविरा व रेणुका माता ट्रस्टचे (Shri Ekvira & Renuka Mata Trust) अध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी सांगितले.

वटपौर्णिमा उत्साहात

शहरासह ग्रामीण भागात वटसावित्री पौर्णिमा (Vatsavitri full moon) साजरी करण्यात आली. वटपुजेसाठी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू आणि वाण देवून वटपौर्णिमेच्या (Happy Vatpoornime) शुभेच्छा दिल्या. सकाळीच महिलांनी परिसरातील वटवृक्षाची पुजा करून पतीला दिर्घ आयुष्य (Husband's long life) लाभावे म्हणून आराधना करण्यात आली.

निमगूळ येथे पर्यावरण पूरक वटसावित्री पौर्णिमा साजरी करतांना  महिला
निमगूळ येथे पर्यावरण पूरक वटसावित्री पौर्णिमा साजरी करतांना महिला

निमगूळ येथे पर्यावरण पूरक वटसावित्री पौर्णिमा

पर्यावरण पूरक (Environmental supplement) किंवा विधायक उपक्रमाची जोड देऊन निमगुळ ता.धुळे येथील महिलांनी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली. सण-उत्सव साजरी करणे ही आपली परंपरा आहे, परंतु त्याला विवेकी दृष्टीकोण ठेवून किंवा पर्यावरणाचा समतोल न बिघडविता वटसावित्री पौर्णिमा साजरी केली, प्रथम पर्यावरणाचा रक्षणाचा संकल्प केला, नंतर वडाचे झाड शेतात किंवा घरासमोर लावण्याचा संकल्प केला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी महिलांचे कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com