एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह दोघे जेरबंद

पिस्टल विक्रीसाठी आलेला चिमठाणेतील तरूणालाही ठोकल्या बेडया
एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह
दोघे जेरबंद

धुळे - प्रतिनिधी dhule

स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज दुहेरी कामगिरी केली. शहरात गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्रीसाठी फिरणाऱ्या दोघांना जेरबंद केले. तर धुळ्यात पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या चिमठाणेतील तरूणालाही बेड्या ठोकल्या.

एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह
दोघे जेरबंद
Photo# धुळे : स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन

एलसीबीच्या (lcb) या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. शहरात गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने तौसिफ शाह सलिम शाह (रा.80 फुटी रोड, धुळे) हा त्याच्या साथीदारांसह दुचाकीने (क्र .एम. एच. 39 आर.डी.1939) धुळे महापालिका, शिवाजी हायस्कुल परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह
दोघे जेरबंद
Breaking अरे बापरे मेलेले २२ बैल फेकले नदी पात्रात ; जिल्ह्यात खळबळ

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महापालिका परिसरात दोघांचा शोध सुरू केला. महापालिके शेजारील गल्लीमध्ये दुचाकीसह एक जण भरलेली गोणी व दोन पुठ्ठयांचे बॉक्ससह उभे दिसले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. तौसिफ शाह सलिम शाह (वय 24 रा. रमजान बाबा नगर, उस्मानिया मशिद जवळ, 80 फुटी रोड, धुळे) व अतूल कन्हैयालाल राणे (वय 23 रा. गांधी नगर, श्रीनाथ 3 सोसायटी, सपना पान सेंटर, सुरत, गुजरात) अशी दोघांनी त्यांची नावे सांगितली.

एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह
दोघे जेरबंद
अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...!
एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह
दोघे जेरबंद
अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...!

गोणी व बॉक्सची तपासणी केली असता त्यात गुंगीकारक औषधांच्या बाटल्या मिळून आल्या. त्याच्याकडून 30 हजारांची दुचाकी व 64 हजारांच्या वरील औषधाच्या बाटल्या असा एकुण 94 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. पोकाँ कमलेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबरोबरच एलसीबीच्या पथकाने शहरातील साक्री रोडवरील जे. के. ठाकरे चौकाच्या पुढे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एकास पकडले. विजय पांडुरंग माळी (रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) असे त्याने त्याचे नाव आहे. तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली.

तेव्हा त्याच्या कमरेला पिस्टल मॅगझीनसह (गावठी कटटा) मिळुन आली. 20 हजारांचे एक गावटी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. पोकॉ सागर शिर्के यांच्या फिर्यादीवरून विजय माळीविरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3 व 5 उल्लंघन 25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil), अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, योगेश राऊत, असई संजय पाटील, पोहेकॉ रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, पोना संतोष हिरे, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com