ठिबक नळ्या चोरणारे काका-पुतण्या गजाआड

पो.नि.दुर्गेश तिवारी यांच्या टीमचे यश
ठिबक नळ्या चोरणारे काका-पुतण्या गजाआड

दोंडाईचा । श. प्र Dondaicha

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील मांडळ शिवारात ठिबक नळ्या (Drip tubes) चोरणार्‍या काका आणि पुतण्याला (police) पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून पिकअप वाहनासह 2 लाख 75 हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मांडळ शिवारातील संतोष पुंडलीक पाटील यांच्या शेतातील ठिंबक सिंचनच्या नळीचे अंदाजे 170 बंडल हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. बाबतची माहिती दोंडाईचा पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिनेश मोरे, पोना संजय चव्हाण, पोना मोहन पाटील, पोकॉ योगेश पाटील यांचे पथक तयार करून माहिती काढली.

त्यानुसार मनोहर उत्तम गवारे (रा. शेवाळी ता. साक्री) व कुणाल दिलीप गवारे (रा. इंदीरानगर, ताहाराबाद ता. सटाणा जि. नाशिक) हे ठिबक नळी चोरी करून वाहनात टाकून घेवुन जात असतांना पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडून 75 हजार रूपये किंमतीच्या ठिबक सिंचनाच्या नळ्या, 2 लाख रूपये किंमतीचे वाहन (एम.एच. 15 इजी 7760) जप्त करण्यात आले. याप्रकरणी संतोष पुंडलीक पाटील (रा. ठाकुर गल्ली, दोंडाईचा) यांच्या तक्रारीवरून चोरट्यांवर दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना मुकेश अहिरे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com