शर्थीच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यास यश

तब्बल 18 तासांनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत, पोलीस होते तळ ठोकून
शर्थीच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यास यश

धुळे । Dhule। प्रतिनिधी

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) हॉटेल नालंदाजवळ काल सायंकाळपासून उलटलेल्या टँकरमधील गॅस गळती (Gas leak in tanker) अखेर रोखण्यास यश आले आहे. यासाठी बीपीसीएलच्या पथकाचे (Squads of BPCL) रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर के्रनच्या सहाय्याने टँकर बाजुला करून सकाळी अकरा वाजेपासून महामार्गावरील वाहतूक (Transportation) हळुहळु सुरळीत करण्यात आली.

औद्योगिक वसाहतीत मोठे बॉयलर पेटविण्यासाठी (light the boiler) वापरला जाणारा अत्यंत ज्वलनशील प्रोपेन गॅसचा (propane gas) टँकर (क्र. एमएच 12 पीक्यू 0330) काल सायंकाळी मुंबइहून नागपूरकडे जात होता. त्यादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल नालंदा ते अभय महाविद्यालयादरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने (driver lost control) टँकर उलटला. त्यानंतर टँकरमधून गॅस गळती (Gas leak) सुरू झाली. गॅस उग्र वासामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिस (police) पथक घटनास्थळी दाखल झाली.

आवश्यक ती खबरदारी घेत महामार्गावरील वाहतूक रोखत (Stopping traffic) ती शहरातून वळविण्यात आली. त्यानंतर गॅसने पेट घेवू नये म्हणून सतत पाण्याचाही मारा करण्यात आला. परिसरातील विज पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा जळगाव येथून बीपीसीएलचे (f BPCL) हिमांशू शोतन, खोपोली येथील धनंजर गीर यांच्यासह पथक दाखल झाले. त्यांच्याकडून रात्रभर टँकरमधील गॅस गळती बंद (Gas leak off) करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर सकाळी दहा वाजता गॅस गळती रोखण्यात यश आले.

धनंजय गीर यांनी लाकुड व एमसीलच्या मदतीने गॅस गळती रोखली. त्यानंतर उपस्थित पोलिसांसह विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर शहर वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत (Smooth traffic on the highway) केली. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धिरज महाजन, अपर तहसीलदार संजय शिंदे, देवपूर तलाठी प्रमोद पाढेन, धुळे शहर तलाठी कमलेश बाविस्कर, मंडळाधिकारी पंडीत दाळवे, विशाल पाटील, शिवाजी कदम, श्रीकांत खैरनार, कमलेश साळी आदी उपस्थित होती.

पोलिसांची तत्परता-

टँकर उलटून गॅस गळती सुरू झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी (police) कर्तव्य तत्परला दाखविली. काही अधिकारी रात्रभर जागे राहिले. यासाठी पोलिस उपअधिक्षक दिनकर पिंगळे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक धिरज महाजन, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील, महामार्ग मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलिस उपनिरीक्षक चुनिलाल सैंदाणे, आर.डी. जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश भामरे, गणेश ठाकुर व अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com