स्वत:ला सिध्द करण्यासाठी विद्यार्थ्यीनींनी सशक्त व कणखर बनावे

डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालय स्वयंसिध्दा अभियान कार्यशाळा: प्राचार्य डॉ.मनोहर पाटील यांचे प्रतिपादन
स्वत:ला सिध्द करण्यासाठी विद्यार्थ्यीनींनी सशक्त व कणखर बनावे

धुळे । Dhule प्रतिनिधी

स्वत:ला सिध्द (Prove yourself) करणे जीवनात अत्यंत महत्वाचे असुन अन्यायाच्या विरुध्द (Against injustice) लढण्यासाठी मुलींनी रणरागीनी, कणखर (strong) व सशक्त बनावे. आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ इतरांनाही देवुन आपल्या सारखेच त्यांनाही खंबीर बनवा, असा मोलाचा संदेश प्राचार्य डॉ.मनोहर पाटील (Principal Dr. Manohar Patil) यांनी दिला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University,), जळगाव व श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. कर्मवीर डॉ.पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय (Dr. Pa. Ra. Ghogre Science College) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण विभाग व युवती सभेतंर्गत स्वयंसिध्दा अभियान कार्यशाळा (Swayamsiddha Abhiyan Workshop) घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पाटील हे होते. याप्रसंगी ते बोलत होते.

उपप्राचार्य के.एम.बोरसे, विद्यार्थी कल्याण अधिकारी (Student Welfare Officer) प्रा. डॉ. आय. एस. अहिरराव, कराटे प्रशिक्षक प्रा.संदीप बाविस्कर, युवती सभा समन्वयक डॉ.रुपाली पाटील व युवती सभा सदस्यांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. ज्योती ढोले यांनी केले. परिचय प्रा.अश्विनी पाटील यांनी करून दिला.

प्रास्ताविक डॉ. रुपाली पाटील यांनी विद्यार्थीनींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी युवती सभा (Yuvati Sabha) हे माध्यम विद्यापीठाने उपलब्ध केले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. समाजात वावरताना आत्मसंरक्षण अत्यंत गरेजेचे झाले आहे. त्यासाठी स्वयंसिध्दा अभियान राबविले जाते, असे सांगितले.

खंबीर मनाबरोबर शरीर पण खंबीर ठेवणे महिलांना अत्यंत आवश्यक आहे. आहार व शरीर यांचा ताळमेळ ठेवावा. शस्त्र न घेता लढण्याचे प्रशिक्षण म्हणजे ज्युडो कराटे (Judo Karate) आहे, असे उपप्राचार्य के. एम.बोरसे यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या उपलब्ध करुन दिलेल्या विविध उपक्रमांचा फायदा घेऊन मुलींनी स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. आय. एस. अहिरराव यांनी केले. सर्व क्षेत्रात परीपुर्ण असलेली स्त्री स्वसंरक्षणातच मागे राहु नये म्हणुन शरीराचे सक्षमीकरण केलेच पाहिजे, असे कराटे प्रशिक्षक प्रा.संदीप बाविस्कर यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रा.सुषमा देसले, डॉ.अर्चना चौधरी, डॉ.स्वाती पाटील, प्रा.अश्विनी पाटील, प्रा.वैशाली पाटील, प्रा.सायली नंदन या उपस्थित होत्या. कार्यशाळेस विद्यार्थीनींनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.