विद्यार्थ्यांनी अनुभवला वैज्ञानिक चमत्कार!

विद्यार्थ्यांनी अनुभवला वैज्ञानिक चमत्कार!

धुळे Dhule। प्रतिनिधी

येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या डॉ.पा.रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयात (Dr. P.R. Ghogre Science College) राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त (National Science Day) विज्ञान सप्ताह साजरा केला जात आहे. वनस्पतीशास्त्र विभागातर्फे तालुक्यातील सांजोरी येथील जि.प प्राथमिक शाळेत (ZP Primary School) विद्यार्थ्यांसाठी वनस्पतीवर विविध प्रयोगांचे (experiments) आयोजन करण्यात आले.

या शाळेतील चिमुकल्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून देवून शेवाळ, बुरशी यांचे सूक्ष्मदर्शकयंत्र (Microscope ) वापरून प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. याचवेळी वनस्पतीची (plants) विविधता आणि औषधी वनस्पतीचे उपयोग सांगून वनस्पतीमुळेच सजीव सृष्टीची निर्मिती झाली आणि संपूर्ण सृष्टीला अन्न, वस्त्र व निवारा हे वनस्पतीमुळेच मिळतो. त्यामुळे आपण सर्वांनी वनस्पतींची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना गुडमार (Goodmar) या औषधी वनस्पतीमुळे एका मिनिटात तोंडाची चव निघून गेल्याचा प्रत्यक्ष अनुभव (experiments) दिला गेला. परिसरामध्ये अशा औषधी वनस्पती पहावयास मिळतात, त्याचा आपण आरोग्यासाठी(Health) उपयोग केला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रा.डॉ.दत्ता ढाले, डॉ.संजय क्षीरसागर, डॉ.अर्चना चौधरी, डॉ. ज्योती ढोले यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक नवनीत अमृतसागर, श्रीमती पवार, श्रीमती महाले आदींनी मदत केली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.के.एम.बोरसे आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com