भोई समाजाच्या दुकानांवरील हल्ले थांबवा

पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, प्रविणकुमार पाटील यांना निवेदन
भोई समाजाच्या दुकानांवरील हल्ले थांबवा

धुळे Dhule । प्रतिनिधी

एका समाजाविषयी काहींनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा (Offensive statement) भोई समाजाने (Bhoi Samaj) तीव्र निषेध केला आहे. या गुन्ह्यात संबंधितांना अटकही झाली आहे. मात्र त्यानंतरही संपुर्ण भोई समाजाचा वेठीस धरले जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून समाज कंटकांकडून (Social nuisance) समाजबांधवांच्या दुकानांवर हल्ले (Attacks on shops) होत आहेत. समाजाला जातिवाचक शिवीगाळ करत धमकाविले जात आहे. यातून मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत असून हा प्रकार त्वरित थांबवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई (Action) करावी. भोई समाजाला संरक्षण द्यावे, अशी मागणी भोई समाज सेनेतर्फे (Bhoi Samaj Sene) आज करण्यात आली.

यासाठी आज भोई समाज सेनेच्या (Bhoi Samaj Sene) नेतृत्वाखाली समाजबांधवांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की गेल्या 22 एप्रिलला एका मोबाईल संभाषणात (mobile conversation) एका समाजाविषयी तसेच समाजाच्या महिला व त्यांच्या विवाह पद्धतीविषयी अपशब्दांचा वापर (Use of profanity) झाला. ही घटना अतिशय निंदनीय व निषेधार्त आहे.

भोई समाजाने या घटनेचा आधीच निषेधही केला आहे. या गुन्ह्यात संबंधित युवकांना अटक (Youth arrested) झाली असून, ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. कायदा सर्वांसाठी समान असून, कायद्यानुसार जे काही होईल ते आम्हाला मान्य आहे. या घटनेशी भोई समाज व समाजातील कष्टकरी समाजबांधवांचा काही संबंध नसताना चार-पाच दिवसांपासून शहरातील भोई समाजबांधवांच्या भाजीपाला, चणे-फुटाणे विक्री, मासे विक्रीसह अन्य व्यावसायिक दुकाने (shops) लावू देण्यास मज्जाव केला जात आहे.

दुकानांमधील माल रस्त्यावर फेकून नुकसान केले जात आहे. एवढेच नव्हे तर भोई समाजबांधवांना शिवीगाळ करत धमकावण्यात (Intimidating) येत आहे. साक्री रोडवरील भोईवाडा परिसरातील वरील गुन्ह्यातील युवकांच्या घरी घोळक्याने येऊन काही जण जातिवाचक शिवीगाळ करून धमक्याही देत आहेत. हे प्रकार रोजचेच झाले असून, शिवीगाळ करतानाचे व्हीडीओ काढून ते सोशल मीडियावर (Social media) व्हायरल केले जात आहेत. यातून मोठा अनर्थ घडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील भोई समाज अत्यंत दडपणाखाली वावरत आहे. व्यवसाय बंद झाल्याने समाजबांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वास्तविक, भोई समाज मागासवर्गीय असून, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर चालणारा समाज आहे. 22 एप्रिलला घडलेल्या घटनेचे समाज कधीही समर्थन करणार नाही. या पार्श्वभूमीवर काही जणांकडून भोई समाजबांधवांवर होत असलेला अन्याय, शिवीगाळ व नुकसानीचे प्रकार त्वरित रोखावेत, याबाबत पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी तसेच यापूर्वी घडलेला प्रकार वैयक्तीक फोनवरील संभाषणाचा असून, त्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नये. यामुळे भोई समाजाला (Bhoi community) संरक्षण द्यावे व अनुचित प्रकार थांबवावा, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

यावेळी सुरेखा मोरे, योगिता मोरे, कल्पना मोरे, राम मोरे, वैजयंतीबाई भोई, संगीताबाई मोरे, शोभाबाई मोरे, शकुंतला वाडीले, निर्मला चव्हाण, विमलबाई चव्हाण, चित्रा वाडीले, मीना मोरे, मंगला वाडीले, दगूबाई वाडीले, रंजनाबाई वाडीले, सुमनबाई वाडीले, पार्वताबाई ढोले, अर्चना मोरे, प्रतिभा वाडीले, भारतीबाई वाडीले, भिकूबाई वाडीले, कल्पनाबाई वाडीले, सरलाबाई वाडीले, कलाबाई वाडीले, विमलबाई वाडीले, रेखाबाई जावरे, संगीता भोई, प्रियांका वाडीले, अनिता वाडीले, हिराबाई वाडीले यांच्यासह समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.